शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अवधूतची अकाली एक्झीट चटका लावून गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 21:53 IST

पाणी फाऊंडेशच्या वॉटर कप स्पर्धेत अगदी सुरुवातीपासून श्रमदानात पुढाकार घेणाऱ्या अवधूत भगवान वैद्य (२५) या नरसापूर येथील युवकाची एक्झीट सर्वांना चटका लाऊन गेली. त्याचे रविवारी सकाळी आकस्मित निधन झाले.

ठळक मुद्देपाणी फाऊंडेशनच्या श्रमदानात पुढाकार : आकस्मिक निधनाने नरसापूरवर शोककळा

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : पाणी फाऊंडेशच्या वॉटर कप स्पर्धेत अगदी सुरुवातीपासून श्रमदानात पुढाकार घेणाऱ्या अवधूत भगवान वैद्य (२५) या नरसापूर येथील युवकाची एक्झीट सर्वांना चटका लाऊन गेली. त्याचे रविवारी सकाळी आकस्मित निधन झाले.नरसापूर येथे पाणी फाऊंडेशनचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. गावातील हजारो हात गाव पाणीदार करण्यासाठी झटत आहे. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनात युवक घाम गाळत आहे. स्पर्धेतील श्रमदानात अवधूत वैद्य हा युवकही मागे नव्हता. अगदी सुरुवातीपासून आणि तेवढ्याच मनापासून त्याने गावातील युवकांना एकत्र केले. पाण्याचे महत्व पटवून दिले.अवधूतने श्रमदानाचे महत्व पटवून देत दुष्काळावर मात करण्याचा संकल्प केला. त्यामुळे इतर युवकांमध्येही विश्वास जागृत झाला. एक-एक करत शेकडो युवक या चळवळीत सहभागी झाले. श्रमदानाच्या कामात सर्वांनी झोकुन दिले. गावकºयांसोबत मागील एक महिन्यापासून अखंडीतपणे अवधूत हा गावातील दुष्काळावर मात करण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच्या प्रयत्नाला गावकऱ्यांनीही तेवढीच साथ दिली. परंतु अवधूतच मात्र सर्वांची साथ सोडून कायमचा निघून गेल्याने गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. अवधूतचे स्वप्न पूर्ण करण्याचा चंग गावकऱ्यांनी बांधला आहे. दुष्काळावर मात करणे हीच खरी अवधूतसाठी श्रध्दाजंली ठरेल, सांगत पुन्हा नव्याने जोमाने गावकरी कामाला लागले आहे.डफडी वाजवून जनजागृतीअवधूत हा डफडी वाजवून सर्वांना श्रमदानास निघण्यासाठी प्रवृत्त करायचा. रोज सकाळ-संध्याकाळ त्याचा हा उपक्रम सुरु असायचा. यामध्ये युवकही त्यांना मोलाची साथ देत होते. एकंदरीत तो अतिशय उत्साहाने डफडी वाजवून जनजागृती करायचा. त्यामुळे आता डफडी कोण वाजविणार या प्रश्नासोबतच अवधूतची जागा कोण भरुन काढणार, असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.