शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

मोर्चातील निळ्या-पिवळ्या झेंड्यांनी वेधले लक्ष

By admin | Updated: September 30, 2016 02:50 IST

बहुजन समाज पक्ष, अनुसूचित जाती-जमाती हक्क संरक्षण समितीच्या नेतृत्वात निळे-पिवळे झेंडे हातात घेऊन निघालेल्या हजारो नागरिकांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली.

बसपाचे नेतृत्त्व : विविध ३६ संघटनांचा सहभागयवतमाळ : बहुजन समाज पक्ष, अनुसूचित जाती-जमाती हक्क संरक्षण समितीच्या नेतृत्वात निळे-पिवळे झेंडे हातात घेऊन निघालेल्या हजारो नागरिकांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. समता मैदानावरून या मोर्चाला प्रारंंभ झाला. महात्मा फुले चौकात महात्मा जोतिबा फुलेंच्या पुतळ्याला हार्रापण करण्यात आले. नंतर पाच कंदिल चौक, नेताजी चौकमार्गे मोर्चा घोषणा देत बसस्थानक चौकात पोहोचला. तेथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. नंतर मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच केले. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. तारीक लोखंडवाला यांनी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, अनुसूचित जाती-जमातीचा नोकरीतील अनुशेष त्वरित भरावा, सरकारी नोकऱ्यांमध्ये पदोन्नतीत आरक्षण द्यावे, बोगस आदिवासींची चौकशी करावी, मुस्लीम समाजासाठी रंगनाथन मिश्रा आयोगाच्या शिफारशींची त्वरित अंमलबजावणी करावी, सच्चर समितीच्या शिफारशी लागू कराव्या, मुस्लीम समाज अत्याचार प्रतिबंधक कायदा करावा, अनुसूचित जाती-जमातींच्या वसतगिृहांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, आदी मागण्यांसाठी हा मोर्चा असल्याचे स्पष्ट केले. यानंतर शैलेश गाडेकर, बसपाचे प्रदेश सचिव पंडित दिघाडे, मधुसूदन कोवे, अरविंद कुडमेथे, अरविंद कोडापे आदींनी मार्गदर्शन केले. यानंतर तारीक लोखंडवाला, पंडित दिघाडे, बाबाराव मडावींच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना निवेदन सादर केले. सर्व मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. नंतर मोर्चाची सांगता झाली. या मोर्चात आदिवासी अन्याय निवारण समिती, गोंड-गोवारी सेवा मंडळ, गोंडवाना संग्राम परिषद, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, भारतीय बौद्ध महासभा, गोंडवाना गणतंत्र पार्टी, क्रांतिवीर शामादादा कोलाम समाज संघटना, आदिवासी परधान समाज संघटना, बंजारा क्रांती दल तथा राष्ट्रीय विमुक्त महासंघ, भीम टायगर सेना, आॅल इंडिया कौमी तंजीम, आदिवासी मुक्ती दल, राष्ट्रीय मातंग महासंघ, क्रांतिवीर शामादादा कोलाम सामाजिक संघटना, आदिवासी विद्यार्थी संघ, बिरसा ब्रिगेड, अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी परिषद, राष्ट्रीय रवीदास परिषद, गुरू रवीदास विचार मंच, बिरसा ट्रस्ट, अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघ, आदिवासी गोवारी समाज संघटना, विदर्भ मातंग युवक संघटना, मांग गारोडी समाज जागृती मंच, मुस्लीम आरक्षण संघर्ष समिती, ओबीसी क्रांतीदल, तेली समाज महासंघ, भारतीय पिछडा समाज संघटना, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस, दलित-मुस्लीम आदिवासी एकता महासंघ, अखिल भारतीय संवैधानिक हक्क परिषद, सम्राट अशोक ग्रुप, आदिवासी गोवारी समाज विकास कृती समिती, लोक स्वराज्य आंदोलन, कोलाम समाज युवक संघटना, राष्ट्रीय बंजारा क्रांती दल आणि आॅल इंडिया बंजारा संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)चोख पोलीस बंदोबस्तया मोर्चासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी साहेबराव जाधव व पियूष चव्हाण, शहरचे ठाणेदार नंदकिशोर पंत, वडगाव रोडचे ठाणेदार देविदास ढोले यांच्या नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चाचे पहिले टोक बसस्थानक चौकात तर दुसरे टोक पोलीस ठाण्याजवळ होते. यावरून मोर्चात सहभागी विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून येत होता. बसस्थानक परिसरात काही काळ नागपूर, वर्धा, घाटंजी, पांढरकवडाकडे जाणारी वाहने गार्डन रोडमार्गे वळविण्यात आली होती.