शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
3
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
4
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
5
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
6
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
7
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
8
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
9
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
10
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
11
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
12
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
13
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
14
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
15
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
16
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
17
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
18
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
19
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
20
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी

बाजार समिती पदाधिकारी निवडीकडे लक्ष

By admin | Updated: July 7, 2016 02:37 IST

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालकांची सभा १० जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे.

रविवारी सभा : कळंब येथे राष्ट्रवादी काँग्रेस-भाजपाचे निर्विवाद वर्चस्व कळंब : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालकांची सभा १० जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे. याच दिवशी सभापती आणि उपसभापतींची निवड केली जाणार आहे. या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या संस्थेवर राष्ट्रवादी-भाजपा युतीने १८ पैकी १५ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळविले. प्रा.वसंत पुरके गटाचा दारुण पराभव झाला. काँग्रेसला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे आता सर्वात मोठा गट असलेल्या भाजपा-राष्ट्रवादीच्या गटातून पदाधिकारी होणे निश्चित आहे. या संस्थेचे संचालक प्रवीण देशमुख यांनी यापूर्वी सभापती म्हणून काम पाहिलेले आहे. मुंबई बाजार समितीमध्ये संचालक म्हणूनही ते कार्यरत होते. त्यामुळे आताही त्यांनीच सभापतिपद भुषवावे, अशी बहुतांश नवनिर्वाचित संचालकांची इच्छा आहे. त्यांनी स्वत: सभापती होणार नाही, अशी भूमिका घेतली तरच नवीन चेहरा सभापतिपदी दिसेल. अन्यथा प्रवीण देशमुख हेच सभापतिपदी विराजमान होतील, हे निश्चित मानले जाते. सर्वांत महत्वाचे म्हणजे सभापतीपेक्षा उपसभापती कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजपाची युती होती. भाजपाचे चार संचालक निर्वाचित झाले. राष्ट्रवादीचा सभापती झाल्यानंतर भाजपाच्या गटाला उपसभापतिपद दिले जाते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपातून उपसभापती पदावर विवेक अंदुरकर अथवा पवन कदम यांच्यातून एकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे. शेवटी आमदार डॉ.अशोक उईके कोणाच्या गळ्यात उपसभापतीची माळ घालतात यालाच अधिक महत्त्व राहणार आहे. येणाऱ्या काळात सहकार क्षेत्र आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपाला पाय रोवण्याच्यादृष्टीने विचार करावयाचा झाल्यास डोंगरखर्डा येथील सरपंच निश्चल ठाकरे यांनाही उपसभापती मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. (तालुका प्रतिनिधी)