शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
3
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
4
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
5
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
6
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
7
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
8
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
9
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
10
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
11
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
12
"सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
13
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
14
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
15
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
16
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
17
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
18
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
19
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
20
Paresh Rawal : "आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?

शासकीय वाहनाने झालेला अपघात दडपण्याचे प्रयत्न

By admin | Updated: June 5, 2015 00:16 IST

सार्वजनिक बांधकाम उपविभाग महागाव कार्यालयाचे एम.एच.२९/६२७४ या बोलेरो वाहनाने झालेला अपघात दडपण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहे.

महागाव : सार्वजनिक बांधकाम उपविभाग महागाव कार्यालयाचे एम.एच.२९/६२७४ या बोलेरो वाहनाने झालेला अपघात दडपण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहे. उल्लेखनीय म्हणजे उमरखेड येथील एक अभियंता अपघाताच्या वेळी हे वाहन चालवत होता.या अपघातात रोजमजुरीवर आलेल्या एका गरीब कुटुंबातील शंकर गजानन गारूडे हा १२ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना ३० मे रोजी सकाळी ६ वाजता पुसद-यवतमाळ मार्गावर पुसदपासून पाच कि़मी. अंतरावर घडली. घटनेनंतर प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या पुसद येथील मधुकरनगरातील रहिवासी सुखदेव वाघमारे यांनी पोलीस व बांधकाम विभागाकडे तक्रार दाखल केली. प्रत्यक्षदर्शीच्या मते सदर वाहन अभियंता वाहन चालवित होते. अपघातानंतर त्यांनी घटनास्थळावरून पोबारा केला. गंभीर जखमी अवस्थेत मुलाला पुसद शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्याला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याच्या कुटुंबीयाला पोलिसात जाऊ नये म्हणून धमकविण्यात आले. दरम्यान, अपघातग्रस्त वाहन ३० मेपासून ४ जूनपर्यंत अभियंता कार्यालयात दडवून ठेवण्यात आल्याची माहिती आहे. प्रभारी कार्यकारी अभियंता बोराडे यांनी गुरुवारी दुपारी या अपघात प्रकरणाची चौकशी सुरू केली व अपघातग्रस्त वाहनाचे लॉक बुक ताब्यात घेतले. या प्रकरणाची प्रभारी अधीक्षक अभियंता विजय बनगिनवार यांनीही दखल घेतली असून कारवाईचे संकेत दिले आहे. (शहर प्रतिनिधी)