शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

‘आरटीओ’वर प्रहारचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 21:52 IST

आवश्यक कागदपत्रे नसलेल्या आॅटोरिक्षांवर वाहतूक पोलीस व आरटीओ विभागाने शहरात शनिवारी धडक मोहीम राबवून २५ आॅटोरिक्षांवर कारवाई केली. याविरुद्ध आॅटोरिक्षा चालक-मालक व प्रहार आॅटोरिक्षा संघटनेने बंद पुकारला होता.

ठळक मुद्देआॅटोरिक्षा चालकांना मुदत। दंडाची प्रकरणे जाणार न्यायालयात

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आवश्यक कागदपत्रे नसलेल्या आॅटोरिक्षांवर वाहतूक पोलीस व आरटीओ विभागाने शहरात शनिवारी धडक मोहीम राबवून २५ आॅटोरिक्षांवर कारवाई केली. याविरुद्ध आॅटोरिक्षा चालक-मालक व प्रहार आॅटोरिक्षा संघटनेने बंद पुकारला होता. सकाळी झालेल्या बैठकीतही तोडगा निघू न शकल्याने प्रहार आॅटोरिक्षा संघटनेने आरटीओ कार्यालयावर मोर्चा काढला.सकाळी ११ वाजता आॅटोरिक्षा चालक मालक संघटनेतील युनूस खान, शंकर लोहवे, संदीप बेलखेडे यांचे शिष्टमंडळ, सहाय्यक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप, शहर ठाणेदार धनंजय सायरे, अवधुतवाडीचे ठाणेदार आनंद वागदकर यांची सयुंक्त बैठक झाली. यामध्ये कारवाई केलेल्या आॅटोरिक्षाच्या दंडाच्या रकमेवर तोडगा निघाला नाही. मात्र प्रकरण कोर्टात पाठविण्याचा निर्णय झाला. शिवाय कारवाईला आठ दिवसांची स्थगिती देण्यात आली. बैठक आटोपल्यानंतर दंडाच्या रकमेसाठी प्रहार आॅटोरिक्षा संघटनेने बसस्थानक चौकातून आरटीओ कार्यालयावर मोर्चा नेला. येथे दंडाच्या रकमेबाबत चर्चा झाली. मात्र तोडगा निघाला नाही. शेवटी ही प्रकरणे कोर्टात सादर करण्यात यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. सहायक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी ती मान्य केले. ठाणेदार धनंजय सायरे यांनी चोख बंदोबस्त लावला होता. चर्चेनंतर आॅटोरिक्षा चालकांनी आंदोलन मागे घेतले. मोर्चात प्रामुख्याने नगरसेवक नितीन मिर्झापुरे, बिपीन चौधरी सहभागी होते.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस