शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

आर्णी येथे घोडे व्यावसायिक व समर्थकांचा घरावर हल्ला

By admin | Updated: August 2, 2015 02:26 IST

महिलेची तक्रार : ‘त्या’ घटनेची पाहणी करण्यासाठी पोलीस अधीक्षकांची भेट, समेटाच्या वेळी झाला चाकुहल्ला

आर्णी : घोडे व्यावसायिकाला अडविल्याच्या कारणावरून आर्णी येथे शुक्रवारी निर्माण झालेल्या वादाचे पर्यावसान रात्री एका घरावर हल्ला करण्यात झाले. घराची नासधूस केल्याची तक्रार महिलेने दिली आहे. दरम्यान, शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आर्णीला भेट देवून घटनेची माहिती घेतली.आर्णी येथे घोडे व्यावसायिकाचे वाहन अडविण्याच्या कारणावरून सचिन आत्राम व त्याच्या तीन साथीदारांनी वाद घातला. त्यानंतर घोडे व्यावसायिकाच्या मुलांनी सचिन आत्रामच्या घरी जावून याबाबत जाब विचारला. त्यानंतर समेट घडविण्यासाठी शुक्रवारी दुपारी ही मंडळी शिवनेरी चौकात एकत्र आली. त्यावेळी सचिनने चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यानंतर रात्री ८ वाजता सचिन आत्रामच्या घरी आई एकटी असताना दहा ते बारा जणांनी घरी येवून धुडगूस घातला. याप्रकरणी यशोदा आत्राम हिने दिलेल्या तक्रारीवरून अशफाक शेख, दानिश शेख, जाकीर सोलंकी, जावेद, इब्रान चव्हाण, फैयाज शेख, सुदाम गॅरेजवाला, शेख शफीक घोडेवाला, युनुस ड्रायव्हर, खलील शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार होत नाही तोच रात्री १.३० वाजताच्या सुमारास दोन दुचाकीवरून आलेल्या सहा जणांनी सचिन आत्रामच्या घरी धुडगूस घालून घराची नासधूस केली. याप्रकरणाची तक्रार पुन्हा पोलिसात देण्यात आली. या प्रकारामुळे आर्णी शहरात एकच खळबळ उडाली.दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी शनिवारी आर्णी शहराला भेट देवून घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणात गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात येईल, सचिनच्या घरावर हल्ला करणाऱ्यांचा शोध घेवू, नागरिकांनी शांतता ठेवण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे, घोडे व्यावसायिकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे, तर दोन जण अद्याप फरार आहे. यशोदाबाई आत्रामच्या तक्रारीवरून दहा पैकी एकाही आरोपीला अटक केली नाही. पोलिसांनी धरपकड मोहीम सुरू केली आहे. (शहर प्रतिनिधी)