शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

माहूर येथे आत्मशांती महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 21:54 IST

येथील दत्तात्रेय देवदेवेश्वर मंदिराच्या प्रांगणात आत्मशांती महोत्सवाला सुरूवात झाली. या महोत्सवात संत, महंत व भक्तांच्या उपस्थितीत विधीवत प्रारंब झाला.

ठळक मुद्देदत्तात्रेय देवदेवेश्वर मंदिराच्या प्रांगणात आत्मशांती महोत्सवाला सुरूवात झाली.

ऑनलाईन लोकमतमाहूर : येथील दत्तात्रेय देवदेवेश्वर मंदिराच्या प्रांगणात आत्मशांती महोत्सवाला सुरूवात झाली.या महोत्सवात संत, महंत व भक्तांच्या उपस्थितीत विधीवत प्रारंब झाला. पहिल्या दिवशी न्यायंबास बाबा शास्त्री यांनी मानव व्यर्थ आशा, आकांक्षेमुळे मनात येईल तसे वागतो. त्यामुळे अन्याय, अत्याचारासारख्या घटना सहज घडत असल्याचे प्रवचनातून सांगितले. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अध्यात्मिक विचारसरणीचा प्रचार-प्रसार होणे आवश्यक असून या विचारांनीच मनावर संयम ठेवता येईल, असे स्पष्ट केले. न्यायंबास बाबा पुढे म्हणाले, सुमारे साडेसातशे वर्षांपूर्वी सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांनी मानवाने सदाचार, संपन्न जीवन जगावे, तरच त्याचा सर्वांगीण विकास शक्य असल्याचे व स्वैर वागण्याने त्याचा विनाश निश्चित असल्याचे सांगितले होते. त्यामुळे मनावर संयम ठेवावा, थोडाही मनरूपी घोड्याचा लगाम ढिला होऊ देऊ नये, असे आवाहन केले.उद्घाटकीय सत्रात कवीश्वराचार्य माहूर पीठाधीश मधुकरबाबा शास्त्री यांनी आत्मशांती महोत्सवाचे महत्त्व विषद करून मानव मात्रांच्या कल्याणाचे विचार हे केवळ आध्यात्मिक संत परंपरेतूनच समाजाला मिळत असतात, असे सांगितले. वैराग्यमूर्ती दत्ताबापू यांनी दीप प्रज्वलित करून या महोत्सवाचा शुभारंभ केला. यावेळी गोपीराज शास्त्री, शहागडकर बाबा, कृष्णराज बाबा, योगीराज दादा विद्वांस, मुरलीधर विराट शास्त्री उपस्थित होते. या महोत्सवात अखंड श्री दत्त नामाचा जप, अखंड दंडवत सुरू आहे.