शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जुनोनीचा अतुल बनला विक्रीकर निरीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 01:34 IST

प्रतिकूल परिस्थितीवर कठोर परिश्रमाने मात करून तालुक्यातील जुनोनी या आडवळणावरच्या गावातील अतुल प्रभाकर वानखडे याने स्पर्धा परीक्षेचे लक्ष भेदून विक्रीकर निरीक्षक म्हणून शासकीय सेवेत नोकरी मिळविली आहे.

ठळक मुद्देप्रतिकूल परिस्थितीवर मात : दुसऱ्याच प्रयत्नात मिळविले यश

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : प्रतिकूल परिस्थितीवर कठोर परिश्रमाने मात करून तालुक्यातील जुनोनी या आडवळणावरच्या गावातील अतुल प्रभाकर वानखडे याने स्पर्धा परीक्षेचे लक्ष भेदून विक्रीकर निरीक्षक म्हणून शासकीय सेवेत नोकरी मिळविली आहे.अतुल अगदी सामान्य शेतकरी कुटुंबातील आहे. त्याचे वडील प्रभाकर वानखडे हे रात्रंदिवस राबून मुलाच्या शैक्षणिक भविष्याला आकार देण्याचा प्रयत्न करीत होते. प्रचंड आर्थिक मर्यादा असल्याने अतुल पुढे अनेक अडचणी होत्या. पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण त्याने जुनोना येथील शाळेत तर पाचवी ते दहावी पर्यंत पारवेकर विद्यालय आणि ११ ते १२ वी घाटंजीच्या एसपीएम विद्यालयातून उत्तीर्ण केले. पुढील पदवीचे शिक्षण अभियांत्रिकीतून करण्याची इच्छा असतांनाही केवळ आर्थिक स्थिती नसल्याने अतुलने डीटीएड् केले. सोबतच मुक्त विद्यापीठाने बी.ए.ची पदवी घेतली. सीईटीची तयारी करण्यासाठी यवतमाळला आल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेला प्राधान्य दिले. यात त्याला प्रफुल्ल भोयर, आशिष रिंगोले, विवेक वाईकर, विवेक चुनारकर यांचे सहकार्य मिळाले. त्याने पहिल्याच प्रयत्नात एसटीआय २०१५ ची पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली. नंतर आईची प्रकृती बिघडल्याने त्याला आपल्या प्रयत्न थांबवून आईच्या प्रकृतीसाठी वेळ द्यावा लागला. यात तीन ते चार महिन्याचा वेळ गेला. शेवटच्या टप्प्यात अंतिम परीक्षेची तयारी केली. यात १ गुणाने त्याची संधी हुकली. त्यानंतर एमपीएससीची जाहीरात निघाली नाही. याकालावधीत त्याने पुन्हा जोमाने अभ्यास सुरु केला. २९ जानेवारी २०१७ लाख पुन्हा पूर्व परीक्षा दिली. व ३ जूनच्या मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला. याचा निकाल १४ डिसेंबरला लागला. खुल्या प्रवर्गातून अतुलची विक्रीकर निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. अतुलचे हे यश पाहण्यापूर्वी त्याच्या आईचे निधन झाले याची खंत त्याच्या मनात कायम आहे. अतुलने यशाचे श्रेय आई व काकूला दिले. शिवाय स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी प्रफुल्ल भोयर, महेश पाटील, अभिजीत राठोड यांचे विशेष सहकार्य मिळाल्याचे सांगितले. स्पर्धा परीक्षा अनिश्चिततेच क्षेत्र आहे. चिकाटी व कठोर परिश्रमात सातत्य या आधारावर यश नक्की मिळत असल्याचा विश्वास अतुलने व्यक्त केला.