शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

वृद्धेचा लुगड्याने गळा आवळणारा मारेकरी गजाआड

By admin | Updated: February 15, 2015 01:58 IST

लुगड्याच्या पदराने गळा आवळून वृध्देला ठार मारण्याची घटना तालुक्यातील कापरा (किटा) येथे रविवारी उघडकीस आली होती.

यवतमाळ : लुगड्याच्या पदराने गळा आवळून वृध्देला ठार मारण्याची घटना तालुक्यातील कापरा (किटा) येथे रविवारी उघडकीस आली होती. अखेर आठ दिवसानंतर घटनेचा उलगडा हाऊन मारेकऱ्याला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. देवेंद्र मधुकर भरगडे (२५) रा. कापरा असे आरोपीचे नाव आहे. तर किसनाबाई किसन देवकर (७२)असे मृत वृध्देचे नाव आहे. कापरा येथील शाळेत शनिवारी रात्री सांस्कृतीक कार्यक्रम होता. हा कार्यक्रम पहाण्यासाठी किसनाबाई बाहेर पडली. दरम्यान रविवारी सकाळी घराजवळच तिचा मृतदेह आढळून आला होता. घटनास्थळी कुठलाही पुरावा नसल्याने घटनेचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते. घटनेचा कुणीही प्रत्यक्षदर्शी नसल्याने गोपनीय माहितीवरूनच या घटनेचा छडा लागू शकतो हे यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान धनरे यांनी हेरले. त्यांनी गावातून कोण बेपत्ता आहे, याची माहिती काढली. त्यामध्ये देवेंद्र भरगडे हा गावात नसल्याचे पुढे आले. शनिवारी देवेंद्र गावात आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता देवेंद्रने पोलिसांपुढे घटनेची कबुली दिली. तसेच किसनाबाईच्या घरातील पैशाची पेटी उचलत असताना ती तेथे पोहोचली. तिने आपल्याला ओळखले आता गावभर आपला बोभाटा होईल, म्हणून लुगड्याने गळा आवळून तिला ठार केल्याचे त्याने पोलिसांपुढे उघड केले. (स्थानिक प्रतिनिधी)