शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

टोर्इंगच्या मनमानीचा तत्काळ बंदोबस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 23:43 IST

पार्किंगची सोय केलेली नसताना वाहने टोर्इंग करून नेली जात आहे. शिकवणी वर्ग, व्यावसायिक प्रतिष्ठानांसमोर उभी असलेली वाहने वाहतूक पोलीस पथक वाहनात टाकून घेऊन जाते.

ठळक मुद्देमानवाधिकार संघटनेची विनंती : प्रवासी वाहतूक, अवैध व्यवसाय थांबवा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पार्किंगची सोय केलेली नसताना वाहने टोर्इंग करून नेली जात आहे. शिकवणी वर्ग, व्यावसायिक प्रतिष्ठानांसमोर उभी असलेली वाहने वाहतूक पोलीस पथक वाहनात टाकून घेऊन जाते. यात नागरिकांना त्रास होण्यासोबतच वाहनाचेही नुकसान केले जात आहे. हा प्रकार थांबवावा, अशी मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. शिवाय जिल्ह्यात बोकाळलेली अवैध प्रवासी वाहतूक, कळंब चौक ते तायडेनगर परिसरात रात्री १२ वाजतानंतरही सुरू राहात असलेली दुकाने बंद करावी, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.शहराच्या अनेक भागात नो पार्किंगचे फलक नाही. पार्किंग मर्यादा निश्चित केलेली नाही. काही भागातच अशा प्रकारच्या सूचना झळकतात. कोचिंग क्लासेस, संगणक केंद्र, टायपिंग सेंटर याठिकाणी अशा कुठल्याही सूचना लावलेल्या नाही. दाटीवाटीने ठेवलेली वाहनेही टोर्इंग करून नेली जातात. विचारणा केल्यास पार्किंगचे फलक लावणे आमचे काम नाही, असे उद्धट उत्तर दिले जाते. प्रामुख्याने दुचाकीस्वारांना याचा अधिक त्रास आहे. अवैध प्रवासी वाहतुकीची वाहने रस्त्याच्या अगदी मधोमध उभी केली जात असताना त्याकडे कानाडोळा केला जातो.कळंब चौक ते तायडेनगर परिसरात रात्री १२ नंतरही काही दुकाने सर्रास सुरू राहतात. काही ठिकाणी अवैध व्यवसाय होत असल्याची माहिती आहे. या भागाशी संबंधित आणि रात्रगस्तीवर असलेले पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. या प्रकाराकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.आझाद मैदानातील जलतरण तलावात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. याला जलतरण तलावाची जबाबदारी असलेले कर्मचारी जबाबदार आहे. सदर प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना विदर्भ उपाध्यक्ष अमित जयस्वाल, श्याम वैष्णव, सचिन कोंढेकर, अजय ठाकूर, देशमुख, अ‍ॅड. बाविस्कर, राजेश गारूडे, शैलेश शर्मा, पुरुषोत्तम तामने, सागर रेमनगुंडे आदी उपस्थित होते.