शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅरोमा पार्क खाताहेत गटांगळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 06:00 IST

वनविभागाच्या या पार्कसाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यात चेनलिंक फेनसिंग, खडीकरणासह रस्ता बांधकाम, पाथ-वे, विहीर खोदकाम, ग्रील कंपाऊंड, पेविंग वॉक, तिकीट घर, वनचेतना केंद्र आदी कामांचा समावेश आहे. या वेगवेगळ्या कामांसाठी अपेक्षित खर्चही निश्चित करण्यात आलेला आहे.

ठळक मुद्देनेर येथे नियमांची वाट : चार वर्षांपासून काम सुरूच, बांधकाम व वनविभागाची टोलवाटोलवी

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : नागरिकांना विरंगुळा आणि शहराचे सुशोभिकरण यासाठी नेर येथे तयार होत असलेला अ‍ॅरोमा पार्क (वनउद्यान) गटांगळ्या खात आहे. मागील चार वर्षांपूर्वी सुरू झालेले काम कधी पूर्ण होईल याविषयी अनिश्चितता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हे काम केले जात आहे. होत असलेल्या कामाचा दर्जाही सुमार असल्याचे अनेक बाबींवरून स्पष्ट होते.वनविभागाच्या या पार्कसाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यात चेनलिंक फेनसिंग, खडीकरणासह रस्ता बांधकाम, पाथ-वे, विहीर खोदकाम, ग्रील कंपाऊंड, पेविंग वॉक, तिकीट घर, वनचेतना केंद्र आदी कामांचा समावेश आहे. या वेगवेगळ्या कामांसाठी अपेक्षित खर्चही निश्चित करण्यात आलेला आहे. आतापर्यंत झालेल्या कामांचा दर्जा तपासण्याचे सौजन्य सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दाखविले गेले नाही. किशोर जयस्वाल यांना या कामाचा कंत्राट देण्यात आला आहे.प्रत्यक्षात कामावर झालेला लाखो रुपये खर्च पाहता कामाची गती आणि दर्जा शोचनिय आहे. सदर पार्कचे काम करत असलेला कंत्राटदार बांधकाम विभागाला जुमानत नसल्याचे सांगितले जाते. वेळोवेळी पैसा उपलब्ध करून देऊनही कामाला विलंब लावला जात आहे. दरम्यान, वनविभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देऊन कामाला होत असलेल्या विलंबाविषयी विचारणा केली. तीन आठवडे लोटूनही कंत्राटदाराने या पत्रावर उत्तर दिले नाही.अ‍ॅरोमा पार्क महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नातून होत आहे. कोटी रुपयाचा निधी त्यांनी या कामासाठी उपलब्ध करून दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी अ‍ॅरोमा पार्कचे लोकार्पण व्हावे, यासाठी त्यांचे प्रयत्न आहे. तशी विचारणाही त्यांनी केली. यावर वनविभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारले. मात्र बांधकाम विभाग कंत्राटदाराकडे बोट दाखवित आहे. वनविभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या पार्कच्या कामाविषयी गांभीर्य दाखविले जात नसल्याचे दिसून येते.अ‍ॅरोमा पार्कची कामे लवकरात लवकर व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे. कामात होत असलेल्या दिरंगाईबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाशी चर्चा करण्यात येईल. शिवाय नवीन कामांसाठी प्रस्ताव टाकण्याच्या सूचनाही केल्या आहेत.- संजय राठोड, महसूल राज्यमंत्री म.रा.अ‍ॅरोमा पार्कचे काम २०१४-१५ ला सुरू झाले. कामाला होत असलेल्या विलंबाविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र उत्तर मिळाले नाही.- अंकित नेहारे,प्र. वनपरिक्षेत्र अधिकारी, नेरअ‍ॅरोमा पार्कचे काही काम शिल्लक आहे. ते लवकरच पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. वनविभागाने पार्कच्या कामाविषयी विचारलेल्या पत्राला उत्तर दिले आहे.- ए.बी. काझी, सहायक अभियंता, सा.बां. विभाग नेर