शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

आर्णीत चार गणात काँग्रेस, दोनमध्ये सेना

By admin | Updated: February 25, 2017 01:05 IST

तालुक्यात पंचायत समिती निवडणुकीसाठी चार गण होते. त्यापैकी चार गणात काँग्रेस तर दोन गणात भाजपाने बाजी मारली आहे.

भाजपाला दोन गटात यश : पंचायत समिती निवडणूक राजेश कुशवाह   आर्णी तालुक्यात पंचायत समिती निवडणुकीसाठी चार गण होते. त्यापैकी चार गणात काँग्रेस तर दोन गणात भाजपाने बाजी मारली आहे. सेनेलाही दोन ठिकाणी यश मिळाले आहे, तर राष्ट्रवादीचा पूर्णपणे सफाया झाल्याचे चित्र आहे. आर्णी तालुक्यात यावेळी चार गणात काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. देऊरवाडीमध्ये काँग्रेसच्या सविता राठोड यांनी राष्ट्रवादीच्या संगीता राठोड यांचा पराभव केला. या ठिकाणची लढत ही अतिशय चुरशीची ठरली. तसेच सुकळी गणात सेनेचे श्रीकांत ऊर्फ रवी राठोड यांनी राजेंद्र राठोड यांचा ४३८ मतांनी पराभव केला. बोरगाव गणात पपिता भाकरे यांनी काँग्रेसच्या विशाखा राठोड यांचा पराभव केला. उल्लेखनीय म्हणजे यापूर्वी संतोष भाकरे यांनी या गणाचे प्रतिनिधित्व केले आहे. भंडारी गणात काँग्रेसच्या ज्योती उपाध्ये विजयी ठरल्या. त्यांनी वीणा राठोड यांचा ४१० मतांनी पराभव केला. सावळी गणात भाजपाच्या प्रियतमा बनसोड यांना २८३५ मते पडली तर त्यांच्या विरोधातील वनिता रामटेके यांना २३५२ मते पडली. २८३ मतांनी भाजपाच्या प्रियतमा बनसोड यांनी बाजी मारली. इचोरा गणात सूर्यकांत जयस्वाल यांनी २१८९ मते घेतली. त्यांनी या ठिकाणी राजीव राठोड यांचा पराभव केला. जवळा गणात अनुपकुमार जाधव यांनी विनोद पंचभाई यांचा ३८६ मतांनी पराभव केला आहे. लोणी गटात काँग्रेसचे विलास अगलधरे हे विजयी ठरले. त्यांनी शिवाजी पारधी यांचा या ठिकाणी पराभव केला. चार गणात काँग्रेसला तालुक्यात यश मिळाले. भाजपा दोन व शिवसेनेला दोन जागा मिळाल्या आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मात्र पंचायत समिती गणात खातेही उघडू शकले नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांच्या मार्गदर्शनात साजीद बेग, आरिज बेग, विलास राऊत आदींसह अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध प्रचार केल्याने काँग्रेसला काही प्रमाणात का होईना आर्णी तालुक्यात यश प्राप्त झाल्याचे दिसून आले. त्या तुलनेत इतर पक्षांच्या वरिष्ठांनी याकडे लक्ष दिले नाही. उल्लेखनिय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रसकडून आवश्यक असा प्रचार झाला नाही.