शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

आर्णीचे तीन पोलीस कर्मचारी निलंबित

By admin | Updated: December 23, 2016 02:12 IST

तालुक्यातील जवळा येथील मूर्ती विटंबना प्रकरणी येथील पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले.

मूर्ती विटंबना : पोलीस अधीक्षकांची कारवाई आर्णी : तालुक्यातील जवळा येथील मूर्ती विटंबना प्रकरणी येथील पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी गुरुवारी ही कारवाई केली. तालुक्यातील जवळा येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूला असलेल्या हनुमान मूर्तीची विटंबना करण्यात आली होती. या मूर्तीला शेण फासण्यात आले होते. ही घटना २० डिसेंबरला रात्री उशिरा घडली होती. दुसऱ्या दिवशी ही बाब लक्षात येताच उपविभागीय अधिकारी नीलेश पांडे, ठाणेदार संजय खंदाडे, पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र तिडके, सतीश वळवी आदींनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांच्या सहकार्याने प्रकरण शांत केले होते. यापूर्वीही जवळा येथे मूर्ती विटंबनेचे जवळपास चार प्रकरण घडले होते. कोणत्यातरी निवडणुकीपूर्वी विटंबनेचे असे प्रकार सातत्याने घडत आहे. अशा घटनांनी गावाची शांतता धोक्यात येऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. मात्र २० डिसेंबरला घडलेल्या घटनेनंतर पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देत मोठा अनर्थ टाळला होता. दरम्यान ही गंभीरबाब लक्षात येता पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी आर्णी पोलीस ठाण्यातील कर्मचारी संदीप सरडे, दिगांबर शेळके, मंगेश कंबाले यांच्याविरुद्ध मूर्ती संरक्षणासाठी समिती गठित न करणे, मूर्ती परिसरात सकाळ-सायंकाळ गस्त न करणे, मूर्तीच्या सुरक्षिततेसाठी योग्य उपाययोजना न करणे आदी ठपका ठेवला. यावरून या तिघांनाही निलंबित करण्यात आले. कर्तव्यातील हयगय या तीन कर्मचाऱ्यांंना भोवली आहे. (तालुका प्रतिनिधी)