शहरं
Join us  
Trending Stories
1
फिलीपींसमध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या
2
RBI MPC Policy Live: दिवाळीत कर्ज महागच! EMI कमी होण्याची वाट पाहणाऱ्यांचा भ्रमनिरास; रेपो दर 'जैसे थे'
3
Asia Cup 2025: ' ट्रॉफी पाहिजे तर...',  बैठकीतील राड्यानंतर एसीसी अध्यक्ष नक्वी तयार, पण आता ठेवली नवीनच अट...
4
७५ वर्षाचा नवरदेव अन् ३५ वर्षाची नवरी; लग्नाच्या रात्रीच वृद्ध पतीचा मृत्यू, घातपाताचा संशय
5
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनची वसूली, ऊसासाठी प्रतिटन १५ रुपये कपात; राजू शेट्टींचा हल्लाबोल
6
बनावट नोटाचा 'बाजार'; कोणत्या राज्यात सर्वाधिक छपाई, महाराष्ट्रा कोणत्या गुन्ह्यांमध्ये पहिला?
7
आजपासून UPI पेमेंटचं महत्त्वाचं फीचर बंद; आता थेट पैसे मागता येणार नाहीत!
8
दुसऱ्यांदा आई होणार सोनम कपूर? 'वायू'च्या जन्मानंतर कुटुंबात पुन्हा चिमुकल्या पाहुण्याची चाहुल
9
अनिल देशमुखांवर झालेला 'तो' हल्ला बनावट; पोलिसांच्या बी समरी रिपोर्टमधून धक्कादायक दावा
10
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
11
1 October 2025 Rules Change: रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते UPI पेमेंट पर्यंत, आजपासून झाले 'हे' महत्त्वाचे ८ बदल
12
प्रियकराने सोनमला संपविले अन् अजगर असलेल्या विहिरीत फेकले; दोन वर्षांनी पोलिस शोधायला गेले...
13
६३ कोटींचा दसरा मेळावा, भाजपाचा गंभीर दावा; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, ९ आकड्याचं गणित सांगितलं
14
RBI Policy पूर्वी शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, फार्मा शेअर्समध्ये तेजी
15
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
16
'कल्कि २' मधून बाहेर पडल्यानंतर दीपिका पादुकोणचं मोठं वक्तव्य; म्हणाली- 'मी नेहमी माझ्या अटींवर...'
17
"असीम मुनीर म्हणाले, तुम्ही कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले"; डोनाल्ड ट्रम्प आता काय बोलले?
18
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
19
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
20
"...तर तुमची चूक माफ करणार नाही"; प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनूची पहिली पोस्ट, वाचून डोळे पाणावतील

आर्णीसाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच, शिवसेनेचाही दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 21:22 IST

आर्णी विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेसच्या अनेक चेहऱ्यांनी मोर्चेबांधणी चालविली आहे. पक्षाच्या एका कार्यक्रमात हे सर्व प्रमुख चेहरे एकाच व्यासपीठावर आल्याने त्याची चर्चा सुरू झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आर्णी विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेसच्या अनेक चेहऱ्यांनी मोर्चेबांधणी चालविली आहे. पक्षाच्या एका कार्यक्रमात हे सर्व प्रमुख चेहरे एकाच व्यासपीठावर आल्याने त्याची चर्चा सुरू झाली.आर्णी विधानसभा मतदारसंघ प्रा. राजू तोडसाम यांच्या रुपाने भाजपच्या ताब्यात आहे. या मतदारसंघावर एक-दोन अपवाद वगळता गेली कित्येक वर्षे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांचे वर्चस्व राहिले आहे. भाजपच्या सर्वेक्षणात आर्णी मतदारसंघ रेड झोनमध्ये असल्याचे अनेक महिने सांगितले जात होते. परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या हंसराज अहीर यांना ५७ हजार मतांची आघाडी मिळवून देऊन आमदार तोडसाम यांनी रेड झोनची चर्चा खोटी ठरविली. या आघाडीने तोडसाम यांच्या फेर उमेदवारीतील संभ्रमही दूर झाला. तरीही भाजपातील काही मंडळी आर्णी विधानसभेची तिकीट मिळविण्यासाठी उत्सुक व इच्छुक आहेत. त्या दृष्टीने त्यांनी मोर्चेबांधणीही चालविली आहे. काहींनी संघाचे ‘कन्सेन्ट’ मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. तोडसाम रिपीट होऊ नये म्हणून भाजपातूनच त्यांची जुनी प्रकरणे उकरुन काढून श्रेष्ठींकडे त्यांच्या प्रतिमेला उजाळा देण्याचा प्रयत्न होतो आहे. ‘ऐन निवडणुकीच्या वेळी’ पुन्हा पोलिसात अर्जफाटे-तक्रारी तर होणार नाही ना, अशी हूरहूरही तोडसाम समर्थकांमध्ये पहायला मिळते. ते पाहता तोडसाम यांना आधी उमेदवारी व नंतर विजयासाठी संघर्ष करावा लागण्याची चिन्हे आहेत.काँग्रेसकडून परंपरागत उमेदवार म्हणून अ‍ॅड. शिवाजीराव मोघे टॉपवर आहेत. युवकांच्या फळीतून त्यांचा मुलगा जितेंद्र मोघेसुद्धा उमेदवारीसाठी धडपडतो आहे. आतापर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसमध्ये मोघेंच्या नावाने ओळखला जायचा. परंतु आता पक्षातून उदयास आलेल्या नेतृत्वाची डोकेदुखी मोघेंपुढे वाढली आहे. सध्याच सहा ते सात जणांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज दाखल केले आहेत. ते पाहता मोघेंना पक्षांतर्गत विरोध होत असल्याचे दिसते. पक्षाने वयाचा मुद्दा उपस्थित केल्यास शिवाजीराव मोघेंकडे मुलगा जितेंद्रचा पर्याय आहे. मात्र घराणेशाही म्हणून पक्षातून विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही.आर्णी मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असला तरी युतीतील वाटाघाटीत या मतदारसंघावर शिवसेनेने दावा सांगितला आहे. सेनेकडे अद्याप लोकप्रिय चेहरे उपलब्ध नसले तरी ऐनवेळी काहींना रिंगणात उतरविण्याची तयारी केली जात आहे. त्यात एका शिक्षक कम नेता, महसूल अधिकारी यांचा समावेश आहे. या मतदारसंघात राष्टÑवादी काँग्रेसनेही चाचपणी चालविली आहे. पक्षातील एका महिला पदाधिकाºयाला निवडणुकीसाठी आर्णीची दिशा दाखविली गेली आहे. आर्णी तालुक्यात पक्षाचे विधान परिषद सदस्य असल्याने त्यांच्या माध्यमातून विधानसभेचा आखाडा गाजविण्याची राष्टÑवादीची व्युहरचना आहे.एकूणच आर्णी विधानसभा मतदारसंघात भाजप व काँग्रेसच्या प्रमुख उमेदवारांना आपले तिकीट आणण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे बराच घाम गाळावा लागण्याची चिन्हे दिसत आहेत. दोन्ही पक्षातून अनेक नवीन चेहरे मतदारसंघात अचानक फिरताना दिसत असल्याने त्यांचा मनसुबा मतदारांच्या नजरेतून लपलेला नाही.नवख्यांना पक्षांतर्गत विरोधकांचे ‘टॉनिक’काँग्रेसमधून अर्ध्या डझनावर नवे चेहरे आर्णी विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्नरत आहेत. त्यातील काही चेहऱ्यांना बरीच मर्यादा आहे. मात्र त्यांना पक्षातील विरोधकांकडून कधी उघडपणे तर कधी छुप्या पद्धतीने ‘टॉनिक’ दिले जात असल्याने ते उघडपणे मोघेंच्या उमेदवारीला आव्हान देताना दिसत आहे. कालपर्यंत मोघेंचा झेंडा हाती घेणारे हे कार्यकर्ते अचानक विरोधात उभे झाले कसे, याचे आत्मचिंतन करून त्यांचे रिमोट नेमके कुणाच्या हाती याचा शोध साहेबांनी घ्यावा, असा सूर मोघे समर्थकांमधून ऐकायला मिळतो आहे.