शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

आर्णीला गारपिटीने झोडपले

By admin | Updated: March 13, 2015 02:26 IST

तालुक्यात बुधवारी रात्री जोरदार वादळासह गारांचा पाऊस कोसळला. यामुळे शेती पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहे. तर फळबागा जमीनदोस्त झाल्या आहे.

आर्णी : तालुक्यात बुधवारी रात्री जोरदार वादळासह गारांचा पाऊस कोसळला. यामुळे शेती पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहे. तर फळबागा जमीनदोस्त झाल्या आहे. या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांची अतिशय दयनीय स्थिती झाली आहे. वादळाच्या तडाख्यात रबीतील गहू, हरभरा ही पिके जवळपास नष्ट झाली आहे. या शिवाय उन्हाळी भूईमूगालाही मोठा फटका बसला आहे. जवळा परिसरातील किन्ही, ब्राह्मणवाडा, पारधी तांडा, हरलाल हेटी, खंडाळा, शिरपूर, चांदणी, गौणा, जांब, शेलू, जांब चांदापूर, नवनगर येथे सर्वाधिक हानी झाली आहे. शेतातील संत्रा, पपई, मोसंबी, गहू, हरभरा, डाळींब, कापूस, ज्वारीच्या पिकाचे नुकसान झाले. जवळा येथील गणेश कृष्णराव मोरे, सुरेखा गणेश मोरे यांची संत्रा बाग नष्ट झाली. या ११०० संत्रा झाडांचे नुकसान होवून तब्बल १३ लाखांचा आर्थिक फटका बसला आहे. डाळींबाची १०० झाडे वादळात कोलमडली.सुरेंद्र चौधरी, संतोष चौधरी, राजू चौधरी, गणेश दुर्गे, हरिभाऊ चरेगावकर, किन्ही येथील राजू चव्हाण यांचेही मोठे नुकसान झाले. गुरूदेव विद्यालय जवळा या शाळेच्या चार खोल्यावरील टीनपत्रे उडाली. माधवराव राठोड यांच्या गोठ्याचे टिनपत्रे उडाली. आकाश इंगळे, श्रीराम गायकवाड, भारत पवार, शेख नबी शेख रियाज, अरुण ओंकार, बापू जयस्वाल यांच्या घरावरची टिनपत्रे उडाली. गणेश मोरे यांच्या गोठ्यातील बैलावर जिवंत विद्युत तार तुटून पडल्याने बैल जागीच ठार झाला. राजू चव्हाण यांच्या शेतातील २३ एकर फळबाग, एम.टी. जाधव यांची १३ एकर फळबाग, गणेश मोरे यांचे ११ एकर फळबाग नष्ट झाली. या शिवाय गवणा येथील मंजुषा मनोहर जिल्लेवार, सुहास जिल्लेवार यांच्याही फळबागेचे नुकसान झाले. जवळा परिसरातील ४७० हेक्टर, ब्राह्मणवाडा ४७० हेक्टर, खेड १५८ हेक्टर, उमरी ५० हेक्टर, खंडाळा २१४ हेक्टर, लोणी ७० हेक्टर एवढ्या मोठ्या प्रमाणात वादळाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल महसूल विभागाने तयार केला आहे. (तालुका प्रतिनिधी)