लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जगभरात कच्च्या तेलाचे दर कमी झाले आहेत. मात्र, भारतातच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. सर्वसामान्यांच्या खिशावर डल्ला मारून केंद्र शासनाने देशाला नवा हुकूमशाह मिळाला असल्याचा घणाघाती आरोप शिवसैनिकांनी शुक्रवारी आंदोलनादरम्यान केला. यावेळी बैलगाडीवर दुचाकी ठेवून पेट्रोल दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला, तर काही शिवसैनिकांनी घोड्यावर बसून दरवाढीचे फलक उंचावून निषेध नोंदविला. शिवसैनिकांनी शुक्रवारी राज्यभरात पेट्रोल, डिझेल आणि गॅस दराच्या दरवाढीविरोधात आंदोलन केले. स्थानिक नेताजी चौकातून निषेध आंदोलनाला प्रारंभ झाला. दत्त चौकापर्यंत आंदोलकांनी केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने करीत धडक दिली. दत्त चौकामध्ये या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी आंदोलकांनी केंद्र शासनाच्या विरोधात प्रचंड रोष नोंदविला. केंद्र शासन जनतेच्या विरोधात असल्याने येत्या काळात हे सरकार उलथून टाकावे, असे मत यावेळी शिवसैनिकांनी नोंदविले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, पराग पिंगळे, उमरखेड विधानसभा संपर्कप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम, उपजिल्हाप्रमुख किशोर इंगळे, दिग्रस शहर शिवसेना उपशहर प्रमुख संदीप रत्नपारखी यांची यावेळी भाषणे झाली. या आंदोलनात ॲड. बळीराम मुटकुळे, सतीश नाईक, विकास जामकर, उत्तम ठवकर, मनोज सिंगी, मनोज नाल्हे, संदीप ठाकरे, प्रमोद भरवाडे, रवींद्र भारती, राजू राठोड, गिरीश व्यास यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
पेट्रोल दरवाढीविरोधात सेना रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:00 IST
शिवसैनिकांनी शुक्रवारी राज्यभरात पेट्रोल, डिझेल आणि गॅस दराच्या दरवाढीविरोधात आंदोलन केले. स्थानिक नेताजी चौकातून निषेध आंदोलनाला प्रारंभ झाला. दत्त चौकापर्यंत आंदोलकांनी केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने करीत धडक दिली. दत्त चौकामध्ये या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी आंदोलकांनी केंद्र शासनाच्या विरोधात प्रचंड रोष नोंदविला. केंद्र शासन जनतेच्या विरोधात असल्याने येत्या काळात हे सरकार उलथून टाकावे, असे मत यावेळी शिवसैनिकांनी नोंदविले.
पेट्रोल दरवाढीविरोधात सेना रस्त्यावर
ठळक मुद्देघाेडे, बैलगाडीवर बसून केंद्र शासनाविरुद्ध केली निदर्शने