शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

सेनेचे पालकमंत्री पद सुरक्षित

By admin | Updated: July 22, 2016 01:59 IST

यवतमाळचे पालकमंत्री पद भाजपाला हवे असले तरी युतीच्या फॉर्म्युल्यामुळे शिवसेनेकडील

युतीचा फॉर्म्युला : शिवसेनेच्या दहा मंत्र्यांकडे १२ जिल्हे यवतमाळ : यवतमाळचे पालकमंत्री पद भाजपाला हवे असले तरी युतीच्या फॉर्म्युल्यामुळे शिवसेनेकडील हा जिल्हा सुरक्षित असल्याचा दावा सेनेच्या एका उच्च पदस्थ नेत्याने केला आहे. सुमारे दीड वर्ष संजय राठोड यांच्या रुपाने जिल्ह्यात राज्य सरकारचे एकमेव मंत्री होते. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाच्या मदन येरावार यांना संधी दिली गेली. ना. येरावार मंत्री होताच भाजपाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी यवतमाळचे पालकमंत्री पद भाजपाला मिळावे म्हणून जोरदार मागणी लावून धरली आहे. जिल्ह्यात सात पैकी पाच आमदार भाजपाचे असल्याचे सांगून भाजपाने पालकमंत्री पदावर दावा सांगितला आहे. शिवसेनेला वाशिम, नांदेड या लगतच्या जिल्ह्यात पाठवावे, असा सल्लाही भाजपाच्या गोटातून दिला जात आहे. पालकमंत्रीपद मिळविण्यासाठी भाजपाने विविध स्तरावरुन मोर्चेबांधणी चालविली असली तरी शिवसेनेचे नेते, महसूल राज्यमंत्री संजय राठोड मात्र बिनधास्त आहे. कारण त्यांचा युतीच्या फॉर्म्युल्यावर विश्वास असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जाते. राज्यात भाजपा-सेना युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्री पदे, खाते वाटप याचा फॉर्म्युला ठरला. त्याच वेळी शिवसेनेकडे कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद असावे आणि भाजपाकडे कोणते याचाही फॉर्म्युला निश्चित करण्यात आला होता. या फॉर्म्युल्यामध्ये बदल न करण्याचेही धोरण त्यावेळी ठरविले गेल्याचे सांगितले जाते. युती सरकार स्थापनेच्यावेळी भाजपा-सेनेमध्ये ठरलेल्या या फॉर्म्युल्यामुळे शिवसेनेकडील यवतमाळचे पालकमंत्री पद भविष्यातही शाबूत राहणार असल्याचे मानले जाते. त्यामुळेच संजय राठोड निश्चिंत दिसत आहे. हा फॉर्म्युला असूनही भाजपाने पाच आमदार संख्येचे कारण पुढे करून यवतमाळ शिवसेनेकडून काढून घ्यावा, यासाठी प्रयत्न चालविल्याने शिवसेनेच्या गोटात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पालकमंत्री पदाच्या आडोश्याने आगामी जिल्हा परिषद, नगरपरिषद निवडणुका, विधान परिषद निवडणुका जिंकण्याचा, त्यासाठी जिल्हाभर पक्षबांधणी करण्याचा भाजपाचा मनसुबा आहे. (जिल्हा प्रतिनिधी) दोन मंत्र्यांकडे दुहेरी जिल्हे या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेच्या दहा मंत्र्यांकडे १२ जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामध्ये यवतमाळ, नांदेड, परभणी, औरंगाबाद, उस्मानाबाद, भंडारा, मुंबई शहर, रत्नागिरी, ठाणे, सातारा आदी जिल्ह्यांचा समावेश आहे. दिवाकर रावते आणि डॉ. दीपक सावंत या दोन मंत्र्यांकडे अनुक्रमे नांदेड व परभणी आणि भंडारा-उस्मानाबाद या जिल्ह्यांची दुहेरी जबाबदारी देण्यात आली आहे. आता मंत्रिमंडळ विस्तारात दोन राज्यमंत्री वाढल्याने त्यांच्याकडे उपरोक्त दुहेरीपैकी एका-एका जिल्ह्याची जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती आहे.