शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

दारव्हा पंचायत समितीवर सेना

By admin | Updated: February 25, 2017 01:04 IST

पंचायत समिती निवडणुकीत दहापैकी नऊ जागा जिंकत शिवसेनेने एकतर्फी विजय संपादन केला.

एकतर्फी विजय : दहा पैकी नऊ जागा जिंकल्या, नेतृत्वामुळे यश मुकेश इंगोले   दारव्हा पंचायत समिती निवडणुकीत दहापैकी नऊ जागा जिंकत शिवसेनेने एकतर्फी विजय संपादन केला. त्यामुळे मागील पंचवार्षिकमध्ये सत्ता गाजविल्यानंतर यावेळीसुद्धा जनतेनी कौल दिल्याने पंचायत समितीवर सेनेचाच भगवा फडकणार आहे. या निवडणुकीत अनेक गणामध्ये तुल्यबळ उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे लढत खर तर काट्याची होईल, असे चित्र असताना महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांची प्रचंड मेहनत आणि या भागातील जनतेचा त्यांच्यावर विश्वास कायम असल्याने तालुक्यात जणू भगवी लाट निर्माण झाली व या लाटेत सेना उमेदवारांची लॉटरी लागली. लोही गणात राष्ट्रवादीतून सेनेत प्रवेश केलेल्या सुनीता राऊत यांनी काँग्रेसचे अमोल चौधरी यांचा पराभव केला. भाजपा तिसऱ्या तर राष्ट्रवादी पाचव्या क्रमांकावर फेकल्या गेली. हा गण सर्वसाधारण असताना सेनेने भविष्याचा वेध घेत महिला उमेदवाराला संधी दिली. शेजारच्या चिखली गणात मात्र शिवसेना उमेदवाराचा पराभव झाला. सेना बंडखोर अपक्ष संतोष ठाकरे यांनी बाजी मारली. काँग्रेस तिसऱ्या, राष्ट्रवादी चौथ्या तर भाजप पाचव्या स्थानावर राहिली. डोल्हारी गणात राष्ट्रवादी काँग्रेसला जबर धक्का बसला. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य अमोल राठोड यांनी आपल्या पत्नीला रणांगणात उतरविले होते. परंतु या लाटेत त्यांचा टिकाव लागला नाही. सेनेच्या उषा चव्हाण यांनी त्यांचा पराभव केला तर याच गटातील भांडेगाव गणात सेनेच्या सविता जाधव यांनी काँग्रेसच्या बेबीताई गोमासे यांना पराभूत केले. दोन्ही गणात भाजपा तिसऱ्या स्थानावर राहिली. वास्तविक या गट व गणात काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी होती. तरीसुद्धा त्यांना सेनेचा विजयरथ रोखता आला नाही. बोरी गणात ओमप्रकाश लढ्ढा यांच्या प्रवेशामुळे भाजपाची ताकद वाढली होती. परंतु या वाढलेल्या ताकदीवर मात करत शिवसेनेचे साहेबराव कराळे यांनी भाजपाचे महादेव माहुरे यांचा पराभव केला. राष्ट्रवादी तिसऱ्या तर काँग्रेस चौथ्या स्थानावर राहिली. तळेगाव गणात काँग्रेस उमेदवार जातीय समीकरणात फिट बसत असतानाही विजयी होऊ शकला नाही. सेनेच्या सिंधू राठोड यांनी काँग्रेसच्या अश्विनी खोडे यांच्यावर मात केली. राष्ट्रवादीला तिसऱ्या तर भाजपाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. लाडखेडमध्ये शारदा दुधे तर वडगाव गणात शारदा मडावी या सेना उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुक्रमे माधुरी दुधे व वीणा कोर्टेकर याां पराभव केला. दोन्ही ठिकाणी भाजप तिसऱ्या तर लाडखेडमध्ये काँग्रेस पाचव्या व वडगावमध्ये चौथ्या क्रमांकावर फेकल्या गेली. महागाव क गणात राष्ट्रवादीला विजयाची मोठी अपेक्षा होती. या गणाचे विद्यमान सदस्य प्रा.चरण पवार हे पक्षाला शून्य या आकड्यापासून वाचवू शकतात, असे बोलले जात होते. परंतु त्यांनासुद्धा सेना उमेदवार पंडित राठोड यांनी ४९ मतांनी का होईना मात्र पराभूत केले. तर सायखेड गणाची लढत सेना-भाजपामध्ये झाली. या लढतीत सेनेचे नामदेव जाधव यांनी भाजपाचे मधुसूदन लोहकरे यांना पराभूत केले. दोनही गणात काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर राहिली. पंचायत समिती निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांनी दिग्गज उमेदवार दिले. सर्व ताकद पणाला लावली. पण तरीसुद्धा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व संपूर्ण राज्यात लाटेवर स्वार असणाऱ्या भाजपला देखील दारव्हा तालुक्यात भोपळाही फोडता आला नाही. शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवत शहराप्रमाणे ग्रामीण भागातही आपलाच दबदबा कायम असल्याचे दाखवून दिले. अस्तित्वाच्या या लढाईसाठी राज्यमंत्री संजय राठोड यांनी मेहनत घेतली.