शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
2
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
3
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
4
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले
5
बफर झोनमध्ये बेकायदा इमारती; हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय; वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी
6
अभिनेता एजाज खानच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात उन्हाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी
7
CSMT स्थानकात आता 'दिव्यांग फ्रेंडली' सुविधा; तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालयांमध्ये सोय
8
रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा
9
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
10
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
11
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
12
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
13
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
14
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
15
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
16
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
17
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
18
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
19
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
20
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला

सेनेचा बंद कडकडीत

By admin | Updated: June 29, 2016 02:22 IST

शहरातील वाढती गुन्हेगारी आणि पोलिसांची निष्क्रीयते विरोधात शिवसेनेने पुकारलेल्या यवतमाळ बंदला उत्तम प्रतिसाद मिळाला.

वाढत्या गुन्हेगारीविरोधात मोर्चा : पोलिसांचा मनाई आदेश झुगारला यवतमाळ : शहरातील वाढती गुन्हेगारी आणि पोलिसांची निष्क्रीयते विरोधात शिवसेनेने पुकारलेल्या यवतमाळ बंदला उत्तम प्रतिसाद मिळाला. शहर कडकडीत बंद होते. पोलिसांनी शिवसैनिकांना मोर्चाची परवानगी नाकारली होती. मात्र हा मनाई आदेश झुगारुन पोलिसांविरोधात घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.या मोर्चेकऱ्यांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांपुढे पोलीस यंत्रणेच्या निष्क्रीयतेचा पाढाच वाचला. यवतमाळ शहरात अवैधधंद्याचा सुळसुळाट झाला आहे. सततच्या घरफोड्या, चोऱ्या, खुलेआम सुरू असलेला मटका, जुगार अड्डे, मंगळसूत्र हिसकावणे, खिसे कापणे, पिशव्या पळविणे, गोधनाची कत्तल होत असल्याच्या घटनेविरोधात शहरातील सामान्य जनतेत प्रचंड रोष आहे. यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेच्या विरोधात शिवसेनेने यवतमाळात मंगळवारी बंदची हाक दिली होती. मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी मोर्चा निघणार होता. यामुळे पोलिसांनी सोमवारी रात्री १० वाजता शिवसेनच्या जिल्हाध्यक्षाकंडे मोर्चाला परवानगी नसल्याचे सांगण्यात आले. त्यासोबत कुठलेही निदर्शने न करण्याची सूचना त्यांना देण्यात आली होती.मात्र जनतेचा प्रचंड रोष असल्याने शिवसेने परवानगी झुकारून मोर्चा काढला. यावेळी पोलीस प्रशासनाविरोधात नारेबाजी करण्यात आली. शिवसेनेच्या बंदला सर्वसामान्य नागरिकांनी पाठिंबा दिला. यामुळे व्यासायिक प्रतिष्ठान आणि पेट्रोलपंप बंद होते. बंदने मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट होता. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष ढवळे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेन्द्र गायकवाड, शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रवीण पांंंडे, गजानन डोमाळे, शिवसेना शहर प्रमुख पराग पिंगळे, शिवसेना जिल्हा व्यापारी आघाडी प्रमुख प्रवीण निमोदिया, किशोर इंगळे, सूरज गुप्ता, शिवसेना महिला जिल्हा आघाडी प्रमुख लता चंदेल आदी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)जिल्हाधिकाऱ्यांपुढे नोंदविली नापसंतीबंदी झुगारून मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षावर मोर्चा नेला. यावेळी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त होता. मोर्चेकऱ्यांनी यवतमाळकरांच्या भावना तीव्र स्वरूपात जिल्हा प्रशासनापुढे मांडल्या. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी अवैधधंद्यांविरोधात पुरावे मागितले. शिवसैनिकांनी बुधवारी हे पुरावे सादर करण्याचे आश्वासन दिले. चोऱ्यांच्या वाढत्या घटनावर तीव्र नापंसती नोंदविली.शिवसैनिक हा जागरूक असून, सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी तो सदैव रस्त्यावर उतरतो. त्यासाठी कुणाच्या आदेशाची वाट पाहत नाही. सच्चा शिवसैनिकांनी विविध संघटनांना घेऊन आंदोलन केले. तर मी शिवसैनिक असलो तरी शासनाचा प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. जिल्ह्यात व शहरात होणाऱ्या घटना दुर्दैवी आहेत. गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना वारंवार निर्देश दिले आहेत. आता कालबद्ध कार्यक्रम आखून दिला असून, दीड महिन्यात त्याचे सकारात्मक परिणाम दिसणार आहे. प्रत्येक ठाण्यातील अधिकाऱ्याच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाणार आहे. कायदा व सुव्यवस्थेबाबत कुणाचीही हयगय खपवून घेतली जाणार नाही. - संजय राठोड, पालकमंत्री, यवतमाळ.