शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

यवतमाळात पोलीस शिपायावर सशस्त्र हल्ला

By admin | Updated: December 26, 2016 01:47 IST

स्थानिक बसस्थानक परिसरातील एका भोजनालयासमोर मद्यपान करण्यास मज्जाव केल्याने आरोपीने धारदार गुप्तीने पोलीस शिपायावर हल्ला केला.

 यवतमाळ : स्थानिक बसस्थानक परिसरातील एका भोजनालयासमोर मद्यपान करण्यास मज्जाव केल्याने आरोपीने धारदार गुप्तीने पोलीस शिपायावर हल्ला केला. ही घटना शनिवारी रात्री ११ वाजता घडली. पेट्रोलिंगवरील चार्ली पथकातील शिपायांनी आरोपीला अटक करून वडगाव रोड ठाण्यात आणले असता तेथेही आरोपीने तोडफोड केली. जितू ऊर्फ जितेंद्र चंदूजी खत्री (३०) रा.आमराईपुरा, असे पोलीस शिपायावर हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. मुख्यालयातील शिपाई मोहमद जुनेद मोहमद याकूब व सुधाकर केंद्रे हे शनिवारी रात्री पेट्रोलिंग करीत होते. त्यांना बसस्थानक परिसरात कुख्यात आरोपी जितू खत्री हा भर रस्त्यात मद्यपान करीत असताना दिसला. त्याला मोहमद जुनेद यांनी हटकले असता, खत्रीने जुनेदवर धारदार गुप्तीने हल्ला केला. त्यांच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. तो चुकविला असता, पोटात गुप्ती भोसकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या झटापटीत सुधाकर केंद्रे यांनी आरोपीला कसेबसे मागून पकडले. त्यानंतर तत्काळ जितूला वडगाव रोड ठाण्यात आणण्यात आले. तेथेही त्याने ठाण्यातील खिडकीवर डोक आदळून काचा फोडल्या. टेबल तोडला. एवढेच नव्हे तर त्याला शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना वाहनाच्या ग्रीलवर डोके आदळले. रुग्णालयातही त्याने तोडफोडीचा प्रयत्न केला. या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, ठाणेदार देवीदास ढोले, सहायक पोलीस निरीक्षक सारंग मिराशी, संतोष केंद्रे यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी आरोपीविरूद्ध पोलीस शिपायाच्या तक्रारीवरून प्राणघातक हल्ल्याचा, शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा, आत्महत्या करून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. शिवाय हत्त्यार बंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याची परिसरात दहशत असल्याचे सांगण्यात येते. (कार्यालय प्रतिनिधी)