शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कृती आराखड्यात बनावट अधिग्रहणाला चाप

By admin | Updated: March 11, 2017 01:02 IST

पाणीटंचाई कृती आराखड्यात दरवर्षी अधिग्रहणातून पदाधिकारीच आपली तिजोरी भरतात.

महागावात पाणीटंचाईचा आढावा : अधिग्रहणाच्या निम्म्या प्रस्तावांना लावली कात्री महागाव : पाणीटंचाई कृती आराखड्यात दरवर्षी अधिग्रहणातून पदाधिकारीच आपली तिजोरी भरतात. या प्रकाराला चाप बसविण्याची मागणी करून अधिग्रहणाच्या निम्म्या प्रस्तावाला कात्री लावण्यात आली आहे. गरज असेल तेथे यंत्रणेमार्फत पाहणी करून निर्णय घेतले जावे, असे निर्देश आमदार राजेंद्र नजरधने यांनी दिले आहे. महागाव पंचायत समितीच्या सटवाराव नाईक सभागृहात पाणीटंचाई आढावा बैठकीचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. त्यावेळी ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. गतवर्षी केलेल्या उपाययोजना आणि आता जाणवू लागलेली पाणीटंचाई याचे वास्तव या सभेत अनेक गावच्या सरपंचांनी मांडले. जलयुक्त शिवारवर करोडो रुपये खर्च झाल्यानंतरही पाणीटंचाई कायम आहे. अनेक गावात विहीर अधिग्रहण, टँकरची मागणी करण्यात येत आहे. जलयुक्त शिवारवर संशय निर्माण झाल्याने कृषी विभागाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावण्याची सूचना आमदारांनी दिली. सभेत जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा आमदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सभेला सभापती गोदावरी जाधव, जिल्हा परिषद सदस्य अनिल नरवाडे, विलास भुसारे, परशराम डवरे, पंचायत समिती सदस्य गजानन कांबळे, संदीप ठाकरे, नत्थू आढाव, जनाबाई जाधव, गोदावरी कदम, बेबीताई मुडे, नगरपंचायत मुख्याधिकारी रश्मी चव्हाण, तहसीलदार नारायण इसाळकर, बीडीओ राहुल शेळके, कृषी विकास अधिकारी कैलास वानखेडे, आर.डी. रणवीर आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)