शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात मनमानी

By admin | Updated: November 16, 2014 22:54 IST

येथील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात गेल्या काही दिवसात मनमानी कारभार सुरू आहे. नियमांचा बागुलबुवा करत हकनाक वेठीस धरण्याचे काम केले जात आहे. नियमानुसार असलेल्या

यवतमाळ : येथील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात गेल्या काही दिवसात मनमानी कारभार सुरू आहे. नियमांचा बागुलबुवा करत हकनाक वेठीस धरण्याचे काम केले जात आहे. नियमानुसार असलेल्या प्रकरणातही सातत्याने त्रुट्या काढून आलेल्या व्यक्तीला त्रस्त करण्याचा एककल्ली कार्यक्रम येथील अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. साध्या साध्या गोष्टीसाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी येथे खर्ची घालावा लागत आहे. शल्य चिकित्सक कार्यालयात सामान्य नागरिकापेक्षा सर्वाधिक शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांनाच येरझारा माराव्या लागतात. आरोग्यविषयक तक्रारी असल्यास किंवा शासकीय कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दुर्धर आजाराने ग्रासलेली असल्यास दीर्घ काळाच्या रजेसाठी या कार्यालयातून प्रमाणपत्र घेणे क्रमप्राप्त ठरते. अनेकांना अडचणीच्या क्षणासाठी शासनाकडून वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके दिली जातात. या देयकांना मंजुरी देण्याचा अधिकारही जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयास आहे. मानसिकदृष्ट्या खचलेल्या आणि आरोग्यविषयक समस्यांनी पिचलेल्या व्यक्तीला येथे हमखास नाडवले जाते. अनावश्यक कारण पुढे करून जाणिवपूर्वक अधिकारात नसलेले आक्षेप या वैद्यकीय प्रतिपूर्ती बिलांवर घेतले जातात. त्यामुळे आर्थिक अडचणीच्या काळातही शासनाच्या या योजनेचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळत नाही. सामान्य नागरिकांनाही येथे असाच अनुभव आहे. बरेचदा शाळकरी विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज भासते. अशा विद्यार्थ्यांना एचआयव्हीसारख्या २५ ते ३० चाचण्या करण्यास भाग पाडले जाते. यामुळे वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याकरिता एक ते दीड महिन्याचा कालावधी लागत आहे. यापूर्वी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात इतक्या मोठ्या प्रमाणात अडवणूक झाली नव्हती. पूर्वीही आर्थिक देवाणघेवाणीचा व्यवहार येथे चालत होता. मात्र समोरच्या व्यक्तीची गरज ओळखून संवेदनशीलतेने काम हातावेगळे केले जात होते. आता साध्या साध्या प्रमाणपत्रासाठी एक ते दीड महिना कालावधी लागत असल्याने एक प्रकारे अडवणुकीचेच काम सुरू असल्याचा आरोप होत आहे. बरेचदा शासनाच्या निकषांना केराची टोपली दाखवून संबंधित नागरिकाला अथवा कर्मचाऱ्याला त्याच्या लाभापासून वंचित ठेवले जाते. या बाबत तक्रार घेवून गेलेल्या कर्मचाऱ्यांनी उलटकरणी लाच देण्याचा प्रयत्न करत असल्याची पोलिसात तक्रार देणार, अशी धमकी दिली जाते. या अजब प्रकारामुळे सर्वच जण त्रासलेले आहे. भेटीसाठी आलेल्या व्यक्तीलाही उशिरापर्यंत ताटकळत ठेवण्यात येते. येथील महिला कर्मचाऱ्यांना साडेपाच नंतरही कार्यालयीन कामकाजात व्यस्त ठेवले जाते. अशा अनेक प्रकारचे आरोप केले जात आहे. गेल्या काही दिवसात जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय हे अनेकांसाठी खऱ्या अर्थाने शल्य देणारे ठरले आहे. येथील कुठलेही काम नको रे बाबा अशी म्हणण्याची वेळ अनेकांवर आली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)