शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

नियंत्रणाअभावी सेतूमध्ये मनमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 21:42 IST

दहावीचा निकाल जाहीर झाल्याने यावर्षीच्या सर्वच अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या पाल्यांसाठी विविध प्रकारचे प्रमाणपत्र काढावे लागणार आहे. यामुळे सेतू केंद्रातील गर्दी वाढण्याची शक्यता आहे. सेतू केंद्रातील गैरप्रकार टाळण्यासाठी तेथे नायब तहसीलदार किंवा समकक्ष दर्जाचा एखादा अधिकारी देण्याची नितांत आवश्यकता आहे.

ठळक मुद्देगैरप्रकार वाढले : वणीच्या सेतूमध्ये नियंत्रण अधिकाऱ्यांची नेमणूक आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : दहावीचा निकाल जाहीर झाल्याने यावर्षीच्या सर्वच अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या पाल्यांसाठी विविध प्रकारचे प्रमाणपत्र काढावे लागणार आहे. यामुळे सेतू केंद्रातील गर्दी वाढण्याची शक्यता आहे. सेतू केंद्रातील गैरप्रकार टाळण्यासाठी तेथे नायब तहसीलदार किंवा समकक्ष दर्जाचा एखादा अधिकारी देण्याची नितांत आवश्यकता आहे.सेतू केंद्र हे नागरिकांसाठी सुविधा केंद्र आहे. परंतु वणीच्या सेतू केंद्रात ग्राहकांना नाडवले जात आहे. केंद्रातील अनागोंदी कारभारावर कोणाचाही वचक नाही. त्यामुळे येथे काम करणारे संगणक आॅपरेटरच अधिकाऱ्यांच्या आवेशात वागतात. काही मुले दिवसभर केंद्राच्या बाहेर सावज टिपण्याच्या कार्यात गुंतलेले असतात. बाहेर सावज गवसले की त्याचे काम तो म्हणेल त्या कालावधीत करून देण्याची हमी दिली जाते. सेतू केंद्राचा सर्व कारभार आॅनलाईन असतानाही मागचे प्रमाणपत्र एक-एक डेस्क पार करीत पुढे जाते. ज्याचा कोणी वाली नसतो, त्यांची प्रमाणपत्रे दिलेल्या मुदतही तयार करून मिळत नाही.प्रत्येक आॅपरेटर जादा पैसे ओढण्याच्या मानसिकतेतच संगणकापुढे बसलेला असतो. प्रस्ताव घेणारा तो तपासणारा व प्रमाणपत्र देणारा या सर्वच स्तरावर गांधीजींच्या आशिर्वादानेच काम लवकर होते. जात प्रमाणपत्रासाठी शासनाने २४ नोव्हेंबर २०१७ ला राजपत्र भाग चार-ब प्रसिद्ध करून स्पष्ट केले की, अर्जदाराच्या रक्तसंबंधातील कोणत्याही नातेवाईकाचे जात वैधता प्रमाणपत्र जोडले असल्यास तो महत्वाचा पुरावा मानून इतर पुराव्याची मागणी न करता सक्षम प्राधिकाºयाने जातीचे प्रमाणपत्र निर्गमीत करावे. असे असतानाही वणीच्या सेतूमध्ये कोतवाली बुकाची नक्कल व तेथीलच रहिवासी दाखला याची मागणी केली जाते. शासनाच्या राजपत्रात संबंधित अधिकारी व सेतू केंद्रापर्यंत पोहोचले नाही काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.