शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मध्यावधी बदल्यांसाठी मंत्री-सचिवांची मंजुरी आवश्यक; ‘मॅट’चा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 14:21 IST

कोणत्याही शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्याची मध्यावधी बदली करायची असेल तर त्यासाठी विशिष्ट कारण नमूद करणे व त्यासाठी संबंधित मंत्री-सचिवांची ऑथेरिटी म्हणून मंजुरी आवश्यक आहे असा निर्वाळा मुंबई ‘मॅट’चे न्यायिक सदस्य ए.पी. कुऱ्हेकर यांनी १९ जुलै रोजी दिला आहे.

ठळक मुद्देविशिष्ट कारणांशिवाय झालेली ‘फिजीओ’ची बदली रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोणत्याही शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्याची मध्यावधी बदली करायची असेल तर त्यासाठी विशिष्ट कारण नमूद करणे व त्यासाठी संबंधित मंत्री-सचिवांची ऑथेरिटी म्हणून मंजुरी आवश्यक आहे. या कारण व मंजुरीशिवाय झालेली बदली वैध ठरत नाही, असा निर्वाळा मुंबई ‘मॅट’चे न्यायिक सदस्य ए.पी. कुऱ्हेकर यांनी १९ जुलै रोजी दिला आहे.सामाजिक न्याय विभागातील फिजीओ सुचिता केशव सोनावणे यांच्या प्रकरणात ‘मॅट’ने हा निर्वाळा दिला. सुचिता या येरवडा पुणे येथे कार्यरत होत्या. तेथून त्यांची सांगली जिल्ह्यातील मिरज येथे बदली करण्यात आली. विशेष असे, यापूर्वीसुद्धा त्या मिरज येथे चार वर्षे कार्यरत होत्या. आता त्यांना पुन्हा तेथे आणले गेले. या बदलीला त्यांनी अ‍ॅड. गौरव बांदिवडेकर यांच्यामार्फत ‘मॅट’मध्ये आव्हान दिले. पुण्याचे अपंग कल्याण आयुक्त, सामाजिक न्याय विभागाचे सचिव आणि सुचिता यांच्या पुण्यातील जागेवर नियुक्त करण्यात आलेल्या एन.एन. निलेकर-कानेकर या तिघांना प्रतिवादी बनविण्यात आले. सुचिता यांचे फिजीओचे पद वर्ग - ३ चे आहे. या पदाचा एका जागेवरील ‘टेन्यूअर’ सहा वर्षांचा आहे. त्यानुसार २०२० पर्यंत सुचिता या पुण्यातून बदलीस पात्र ठरत नाही. त्यानंतरही त्यांना दुसऱ्यांदा मिरजला पाठविले गेले. एप्रिल ऐवजी जुलैमध्ये अर्थात मध्यावधी बदली करायची असेल, ‘टेन्यूअर’ कमी करायचा असेल तर त्यासाठी विशिष्ट कारण नमूद करणे आवश्यक आहे. या बदलीला ऑथेरिटी म्हणून संबंधित खात्याच्या मंत्री-सचिवांची मंजुरी आवश्यक आहे. मात्र सुचिता यांच्या प्रकरणात विशिष्ट कारण नाही आणि मंजुरीही नाही. प्रतिवादी निलेकर यांचे विनंती बदलीचे कारण वादी सुचिता यांना लागू होत नसल्याचा युक्तीवाद अ‍ॅड. बांदिवडेकर यांनी केला. हा युक्तीवाद मान्य करीत ‘मॅट’ने सुचिता सोनावणे यांची मिरजेत झालेली बदली रद्द केली. दोन आठवड्यात त्यांना पूर्वपदावर पदस्थापना देण्याचे आदेश देण्यात आले आहे. या प्रकरणात शासनाच्यावतीने सादरकर्ता अधिकारी म्हणून जे.जे. चौगुले यांनी काम पाहिले. या खटल्यात सुचिता यांच्यावतीने अ‍ॅड. भूषण बांदिवडेकर यांनी सहकार्य केले.चुकीच्या शिफारसींवर ‘मॅट’चा ठपकाबदलीस पात्र नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदलीच्या शिफारसी नागरी सेवा मंडळाकडे करणे योग्य नसल्याचा ठपकाही ‘मॅट’ने सामाजिक न्याय विभागावर ठेवला.

टॅग्स :Courtन्यायालय