शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आॅगस्टपर्यंत प्रलंबित कामे मार्गी लावा

By admin | Updated: July 3, 2015 00:23 IST

आॅगस्टपर्यंत सर्व प्रलंबित कामे मार्गी लावा अशा सूचना जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली तंबी : दारव्हा येथे आढावा बैठकदारव्हा : आॅगस्टपर्यंत सर्व प्रलंबित कामे मार्गी लावा अशा सूचना जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दारव्हा येथे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत अधिकारी, कर्मचाऱ्यांना केल्या.विविध विभागाच्या विकासकामांचा आढावा घेण्याकरिता येथील बचत भवनात बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह तालुक्यातील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी पद्भार स्वीकारल्यानंतर त्यांची दारव्हा उपविभागाला पहिलीच भेट होती. त्यांच्या कामाचा धडाका पाहता बैठकीत नेमक काय होणार, याची सर्वांना धास्ती होती. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांच्या मनातील भीती दूर करत मला कुणाचे नुकसान करायचे नाही, तुमच्याकडून काम करून घ्यायचे आहे, असे सुरुवातीला सांगून टाकले. त्यामुळे आजची आढावा बैठक शांततेत पार पडली.बैठकीत तहसील, पंचायत समिती, कृषी विभागाच्या योजनांची प्रगती व कामांचा आढावा घेण्यात आला. त्या-त्या विभाग प्रमुखांनी या बाबत माहिती दिली. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कामांबाबत कर्मचाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या. लोकांची प्रामाणिकपणे कामे करा, त्यांच्यापर्यंत पोहचा. गावाला भेट देण्याच्या तारखा व आपला मोबाईल क्रमांक बोर्डावर लिहा, काम करताना काही अडचणी येत असेल तर आपल्याला कळवा, असे सांगितले. प्रलंबित कामांबद्दल बोलताना सर्व प्रलंबित कामे आॅगस्टपर्यंत पूर्ण करा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.बैठकीला उपविभागीय अधिकारी मनोहर कडू, तहसीलदार प्रकाश राऊत, ठाणेदार मानकर, गटविकास अधिकारी घुगे, तालुका कृषी अधिकारी अंगाईत, सहाय्यक गटविकास अधिकारी राजीव शिंदे यांच्यासह तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, महसूल, पंचायत समिती व कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयाला भेट देऊन कामांची तपासणी केली. त्यानंतर अनेक लोकांकडून निवेदने स्वीकारली. (तालुका प्रतिनिधी)