शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
3
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
4
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
5
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
6
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
7
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
8
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
9
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
10
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
11
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
12
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
13
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
14
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
15
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
16
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
17
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
18
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
19
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
20
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी

दोन उमेदवारी अर्ज

By admin | Updated: June 25, 2015 02:36 IST

येथील नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसतर्फे वंदना मनोज रॉय व तिवारी गटातर्फे श्रद्धा अनिलकुमार तिवारी .....

नगरपरिषद : ३0 जूनला होणार निवडपांढरकवडा : येथील नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसतर्फे वंदना मनोज रॉय व तिवारी गटातर्फे श्रद्धा अनिलकुमार तिवारी यांनी बुधवारी अर्ज दाखल केले. येत्या ३० जूनला ही निवडणूक होणार आहे.विद्यमान नगराध्यक्ष शंकर बडे यांचा कार्यकाळ येत्या ३० जूनला संपुष्टात येत आहे. त्यामुळे नवीन नगराध्यक्षासाठी ही निवडणूक होत आहे़ पुढील अडीच वर्षासाठी नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी राखीव आहे़ नवीन नगराध्यक्षपद कोणत्या महिलेकडे जाते, याबाबत शहरवासीयांमध्ये उत्सुकता होती़ १९ सदस्यीय नगरपरिषदेत काँग्रेस-पारवेकर गटाचे १५ सदस्य असल्यामुळे अध्यक्ष काँग्रेसचा व उपाध्यक्ष पारवेकर गटाचाच होईल, यात शंका नव्हती़ मात्र अध्यक्षपदासाठी वंदना रॉय व पूजा भोयर यांच्यात चुरस निर्माण झाली होती़ त्यामुळे कुणाची वर्णी लागते, याबाबत संभ्रम होता़ दोघीही प्रबळ दावेदार होत्या़ अखेर नगराध्यक्ष बडे यांनी मंगळवारी नगरसेवकांची तातडीची बैठक बोलाविली़ त्यात पूजा भोयर व वंदना रॉय यांना प्रत्येकी सव्वा-सव्वा वर्षे अध्यक्षपद देण्याचा पर्याय समोर आला़ हा पर्याय सर्वांनी मान्य केला़ तथापि सुरुवातीचे सव्वा वर्षं अध्यक्षपद कुणाला द्यायचे, याबाबत बरीच खलबते झाली़ अखेर बुधवारी वंदना रॉय यांना बडे यांनी उमेदवारी अर्ज भरावयास लावला़ त्यांनी दुपारी १ वाजता उमेदवारी अर्ज सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अशोक गराटे यांच्याकडे दाखल केला़ यावेळी विद्यमान नगराध्यक्ष बडे यांच्यासह काँग्रेस व पारवेकर गटाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते़ रॉय यांनी उमेदवारी अर्जाचे तीन संच दाखल केले. विरोधी तिवारी गटातर्फे श्रद्धा अनिलकुमार तिवारी यांनीही अध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज बुधवारी दाखल केला. येत्या ३० जूनला रितसर प्रत्यक्ष मतदान होणार आहे़ काँग्रेस- पारवेकर गटाकडे १९ सदस्यांपैकी १५ सदस्य असल्यामुळे व तिवारी गटाकडे केवळ चारच सदस्य असल्याने रॉय यांची निवड निश्चित मानली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)