शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान पीक विम्याचे अर्ज आज पोहोचणार

By admin | Updated: July 26, 2016 00:04 IST

पंतप्रधान पीक विमा योजनेचे अर्ज सोमवारी पोहोचतील, अशी हमी रिलायन्स कंपनीतर्फे जिल्हा प्रशासनाला दिली होती.

८० हजार अर्ज : उरले केवळ चार दिवस यवतमाळ : पंतप्रधान पीक विमा योजनेचे अर्ज सोमवारी पोहोचतील, अशी हमी रिलायन्स कंपनीतर्फे जिल्हा प्रशासनाला दिली होती. प्रत्यक्षात दिवसभर बँकांमध्ये अर्ज पोहोचले नाही. यामुळे शेकडो शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. त्यावर सारवासारव करीत, रात्री उशिरा अर्ज येतील आणि मंगळवारी ८० हजार अर्जाचे वितरण होईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले. प्रत्यक्षात अर्ज भरण्यासाठी चार दिवस उरले आहेत. मागणीच्या तुलनेत अर्ज अपुरे असल्याची तक्रार बँक व्यवस्थापकांनी कंपनीच्या प्रतिनिधीकडे केली होती. चारच दिवस उरलेले असतानाही जिल्ह्यात पंतप्रधान पीक विमा योजनेचे अर्ज पोहोचले नाही. यामुळे पीक विमा भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. कंपनी सोमवारी अर्ज पाठवेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला होता. प्रत्यक्षात सोमवारी अर्ज पोहोचले नाही. याबाबत कंपनीच्या प्रतिनिधींनी सोमवारी उशिरा रात्रीपर्यंत अर्ज पोहोचतील, असे कृषी विभागाला सांगितले. मात्र अशी स्थिती मंगळवारी उद्भवू नये म्हणून बँका पाठपुरावा करीत आहेत.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्हा शाखेत पंतप्रधान पीक विमा योजनेचे ८० हजार अर्ज पोहोचणार आहेत. या ठिकाणावरून जिल्ह्यातील विविध बँकांना हे अर्ज पाठविले जाणार आहे. या ठिकाणी अर्ज कधी पोहोचतील यावर समोरील प्रवास अवलंबून राहणार आहे. यानंतर शेतकऱ्यांना अर्ज मिळणार आहेत. जिल्ह्यातील बँकांना ३३ हजार अर्ज उपलब्ध झाले आहेत. ८० हजार अर्ज येणार आहेत. पूर्वी पोहोचलेले अर्ज आणि नव्याने येणारे अर्ज याची गोळाबेरीज एक लाख १३ हजारांच्या घरात जाते. यानंतरही दोन लाख ८७ हजार शेतकऱ्यांसाठी लागणारे अर्ज कुठून आणि कधी येतील, असा प्रश्न आहे. चार दिवसात ही कसरत कंपनी कशी करणार आणि या गोंधळात शेतकऱ्यांना पीक विमा काढता येणार की नाही, हा खरा प्रश्न आहे. (शहर वार्ताहर)अंतिम क्षणाला प्रश्न सुटेल का?जिल्ह्याला पावणे चार लाख अर्जाची प्रतीक्षा असताना अंतिम टप्प्यात ८० हजार अर्ज वळते केले आहे. यामुळे सर्वच शेतकऱ्यांना पीक विमा काढता येईल का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर कुठल्या उपाययोजना होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.विमा उतरविताना ओळखपत्र सक्तीचेपीक विमा उतरविताना शेतकऱ्यांना ओळखपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. यामुळे विमा काढताना यावर्षी प्रथमच शेतकऱ्यांना अर्जासोबत ओळखपत्रही जोडावे लागणार आहे.