शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

कर्तव्यावर हजर परंतु लेखणी मात्र बंद

By admin | Updated: July 21, 2016 00:09 IST

ते कर्तव्यावर हजर आहेत. मात्र त्यांची लेखणी बंद आहे. त्यांचा पगारही सुरूच आहे. मात्र काम काहीच नाही.

यवतमाळ : ते कर्तव्यावर हजर आहेत. मात्र त्यांची लेखणी बंद आहे. त्यांचा पगारही सुरूच आहे. मात्र काम काहीच नाही. कार्यालयात स्वाक्षरी करून लिपिकांचे हे आंदोलन आता चर्चेचा विषय ठरले आहे. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेने गेल्या १५ जुलैपासून विविध प्रलंबित मागण्यांसाठी लेखणी बंद आंदोलन पुकारले आहे. त्यांच्या मागण्या न्याय्य आहेत. त्यासाठीच त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. गेल्या पाच दिवसांपासून त्यांचे आंदोलन सुरू आहे. शासनावर आंदोलनाचा दबाव वाढत आहे. त्यांच्या मागण्या मान्य होण्याची चिन्हे दिसू लागली, असा संघटनेचा दावाही आहे. त्यांच्या समस्या सुटाव्यात, अशीच त्यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांची अपेक्षाही आहे. या आंदोलनात गेल्या पाच दिवसांपासून जिल्हा परिषदेतील अनेक लिपिक सहभागी आहे. ते कार्यालयात येतात. मस्टरवर स्वाक्षरी करतात. मात्र आपली लेखणी बंद ठेवतात. लिहिण्याचे कोणतेही काम ते करीत नाही. कामच नसल्याने अनेक लिपिक आपापल्या जागी आढळत नाही. तथापि काही लिपिक खुर्चीवर आढळतात. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना काही लिपिक कार्यालयात हजर आढळले. त्यांना त्यांनी गांधीगिरी करून गुलाबपुष्प दिले. अद्याप हे आंदोलन सुरूच आहे. कोणतेही काम न करता, लेखणी बंद करणाऱ्या लिपिकांचा पगार मात्र सुरूच आहे. कारण ते मस्टरवर स्वाक्षरी करतात. त्यामुळे हे अभिनव आंदोलन जिल्हा परिषद वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. आंदोलनात सहभागी नसलेले लिपिक या आंदोलनाबाबत विविध चर्चा करीत आहे. शासनाचा पगार घेत सुरू असलेले हे आंदोलन वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे. (शहर वार्ताहर)