शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

धूम्रपान व व्यसन टाळण्याची शपथ घेण्याचे आवाहन

By admin | Updated: February 4, 2016 02:32 IST

पहिल्या पाच मृत्यूच्या कारणात कर्करोग हा एक आहे. तंबाखू सेवन व धूम्रपान यामुळे शरीरातील सर्व अवयवामध्ये फुफ्फुस, स्तन, आतडी, स्वादुपिंड, किडनी, योनी मार्ग याचे कर्करोग होतात.

यवतमाळ : पहिल्या पाच मृत्यूच्या कारणात कर्करोग हा एक आहे. तंबाखू सेवन व धूम्रपान यामुळे शरीरातील सर्व अवयवामध्ये फुफ्फुस, स्तन, आतडी, स्वादुपिंड, किडनी, योनी मार्ग याचे कर्करोग होतात. त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीने तंबाखू सेवन व धूम्रपान टाळावे तसेच लहान मुले, अज्ञानी नागरिक यांना यापासून दूर राहण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.टी.जी. धोटे यांनी केले आहे. २०१६ या नवीन वर्षात सुदृढ आरोग्य ठेवण्याचा दृष्टिकोनाने ४ फेबु्रवारी रोजी जागतिक कर्करोग दिवसानिमित्त नागरिकांनी वाईट सवयींना आळा घालण्याची शपथ घ्यावी, शाळेतील मुलांना तंबाखूचे व्यसन लागू नये याकरिता शाळेच्या १०० मीटरच्या क्षेत्रात पानठेले, तंबाखू व धूम्रपान केंद्रांना प्रतिबंध घालावा व धूम्रपान वर्जित क्षेत्रात धूम्रपान करणारे व विके्रते आढळल्यास त्यांना दंडित करण्याची मोहीम हाती घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहे. कर्करोग निदान लवकर होण्यासाठी वैद्यकीय स्तरावर बऱ्याच प्रमाणात वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहे. या माध्यमातून प्राथमिक अवस्थेतील कर्करोगाचे निदान करून घेणे आवश्यक आहे. मुखरोगाच्या कर्करोगासाठी दंतशल्य चिकित्सकाकडून मौखिक तपासणी सहा महिन्याच्या अंतरावर करून घ्यावी, दंतशल्य चिकित्सक सेवा सर्व ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय तसेच वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथे उपलब्ध आहे. स्थनाचा कर्करोग प्राथमिक अवस्थेत मेमोग्राफी तसेच एफएएनसी च्या चाचणीद्वारे करता येते. ही तपासणी सोनोग्राफी केंद्रावर उपलब्ध असते. कर्करोग निदानासाठी पॉप स्मिअर ही तपासणी बऱ्याच पॅथॉलॉजीमध्ये उपलब्ध आहे. शासनाच्या वैद्यकीय महाविद्यालयात मोफत उपलब्ध आहे. सर्विकल कर्करोगासाठी लससुध्दा उपलब्ध आहे. स्त्रियांनी ही लस घेतल्यास सर्विकल कर्करोग टाळता येतो, असे डॉ.टी.जी. धोटे यांनी सांगितले. (वार्ताहर)