शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

बोरगावात एकाच जागी खोदली दुसरी विहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 22:06 IST

‘राकाधाका’मधून खोदलेल्या विहिरीच्याच ठिकाणी मग्रारोहयोतून दुसरी विहीर खोदल्याचा प्रकार उघडकीस आला.

ठळक मुद्देप्रशासनाची कबुली : पहिली ‘राकाधाका’तून दुसरी ‘मग्रारोहयो’मधून

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘राकाधाका’मधून खोदलेल्या विहिरीच्याच ठिकाणी मग्रारोहयोतून दुसरी विहीर खोदल्याचा प्रकार उघडकीस आला. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत खुद्द प्रशासनानेच याची कबुली दिल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी असे प्रकार झाल्याची शंका बळावली आहे.जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी अनिल आडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी स्थायी समितीची बैठक झाली. श्रीधर मोहोड यांनी यवतमाळ तालुुक्यातील बोरगाव येथील विहिरीचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर मग्रारोहयोच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांनी तेथे राकाधाकामधून खोदलेल्या विहिरीवरच मग्रारोहयो अंतर्गत दुसरी विहीर खोदल्याचे कबूल केले. त्यामुळे संबंधितांचे देयक अदा करण्यात आले नसल्याचे सांंगितले. त्यावर मोहोड यांनी राकाधाकामधील कुपनांची माहिती मागितली असता प्रशासनाजवळ उत्तरच नव्हते.या विहिरीचे संपूर्ण रेकॉर्डच गहाळ झाल्याचे निदर्शनास आले. परिणामी तेथे राकाधाकामधून विहीर खोदण्यात आल्याचा कोणताच पुरावा सध्या प्रशासनाकडे नाही. त्यामुळे मग्ररोहयोतील विहिरीचे देयक तत्काळ अदा करण्याची मागणी श्रीधर मोहोड यांनी केली. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश अध्यक्ष माधुरी आडे यांनी दिले. गजानन बेजंकीवार यांनी पाटणबोरी येथील दलित वस्तीतील कामांच्या चौकशीचा अहवाल हॉटेलात बसून तयार करण्यात आल्याचा आरोप केला. तेथील ग्रामपंचायत जागेवर अतक्रिमणाच्या मुद्दावरून मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी अधिकाºयांना पाठीशी घालण्याचा कोणताही हेतू नसून ते माझे नातेवाईक नसल्याचे स्पष्ट केले. मोहोड यांनी सीईओ अधिकाºयांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला होता. बैठकीला बांधकाम व अर्थ सभापती निमीष मानकर, महिला व बालकल्याण सभापती अरूणा खंडाळकर, शिक्षण व आरोग्य सभापती नंदिनी दरणे, जया पोटे, राम देवसरकर, पंकज मुडे उपस्थित होते.मालमत्तांची माहितीच नाहीजिल्हा परिषदेच्या मालकीच्या मालमत्तांची माहिती अद्याप संकलित झाली नाही. खाते प्रमुख व नेर पंचायत समितीने मालमत्तांची माहिती सादर केली. १५ पंचायत समितींनी अद्याप माहिती दिली नाही. जया पोटे यांनी शिक्षण विभागातील रिक्त पदांचा प्रश्न उपस्थित केला. महिला व बालकल्याण सभापती अरूणा खंडाळकर यांनी मच्छिंद्रा शाळेवरील एक शिक्षक दोन वर्षांपासून गैरहजर असल्याचा आणि गौराळा रस्त्याचा प्रश्न उपस्थित केला. राम देवसरकर यांनी कृषी विकास अधिकारी उपस्थित नसल्याकडे लक्ष वेधले. तसेच अंशकालीन निदेशक, ब्राम्हणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे हस्तांतरण, वसतिगृहांच्या अनुदान वाटपाचा मुद्दा उपस्थित केला. बांधकाम सभापती निमीष मानकर यांनी पुसदमधील १९ गावांमधील तीन लाखांच्या सौर पथदिवे खरेदीचा मुद्दा उपस्थित केला. याप्रकरणी समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.