शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

राळेगाव तालुक्यात आणखी एका शेतकऱ्याची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:11 IST

शेतात जागलीस गेलेल्या शेतकऱ्याचा वाघाने फडशा पाडला. विहिरगाव शिवारात अडणी येथील शेतकऱ्याला ठार मारले. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. राळेगाव तालुक्यात वाघाचा हा सातवा बळी ठरला आहे. प्रशासनाकडून बंदोबस्त होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.

ठळक मुद्देसातवा बळी : मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

लोकमत न्यूज नेटवर्कवडकी : शेतात जागलीस गेलेल्या शेतकऱ्याचा वाघाने फडशा पाडला. विहिरगाव शिवारात अडणी येथील शेतकऱ्याला ठार मारले. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. राळेगाव तालुक्यात वाघाचा हा सातवा बळी ठरला आहे. प्रशासनाकडून बंदोबस्त होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. आणखी किती बळी जाऊ देणार, हा त्यांचा प्रश्न आहे.वडकी येथून दहा किलोमीटरवरील अडणी येथील चंडकू भोनू फुटकी (५०) हे स्वमालकीच्या विहिरगाव शिवारात असलेल्या शेतात जागलीसाठी गेले होते. दुपारपर्यंत घरी पोहोचले नाही. कुटुंबातील लोकांनी शोध घेतला असता वाघाने ठार मारलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह शेतापासून तीन किलोमीटर अंतरावर आढळून आला.शेतात असलेल्या झोपडीपासून दूरपर्यंत रक्त पडून असल्याचे आढळल्याने चंडकू यांचा शोध लागला. या शेतकऱ्याच्या शेतात तूर, कापूस ही पिके आहेत. त्याचे संरक्षण करण्यासाठी गेलेले चंडकू वाघाचे बळी ठरले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली व मोठा आप्त परिवार आहे. राळेगाव परिसरात वाघाची प्रचंड दहशत आहे. शेतकरी, शेतमजूर कामावर जाण्याची हिंमत करत नाही. परिणामी शेतीची कामे रखडली आहे, तर मजुरांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे.वनविभागाने गुंडाळली वाघाची शोध मोहीमराळेगाव तालुक्यात वाघाचा धुमाकूळ सुरू असताना वनविभागाने अर्ध्यावरच नरभक्षक वाघाची शोध मोहीम गुंडाळली. लोकांनी दिलेल्या माहितीची कुठलीही दखल घेतली जात नाही. परिसरात वाघ दिसल्याचे सांगितल्यानंतर वनविभागाकडून साधा शोध घेण्याचाही प्रयत्न केला जात नाही. शिवाय घटना घडल्यानंतर तातडीने पोहोचण्याचे सौजन्य दाखविले जात नाही. वनविभागाच्या या भूमिकेमुळेच सखी कृष्णापूर येथे उपविभागीय अधिकारी व त्यांच्या पथकाला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. आता विहिरगाव येथील घटनेबाबतही तेच घडले. पोलीस पोहोचले मात्र वनविभागाच्या कुठल्याही अधिकाऱ्याची याठिकाणी उशिरापर्यंत उपस्थिती नव्हती. त्यामुळे नागरिकांनी चंडकू यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली होती.एसडीओंचे वाहन पेटवूनही बोध नाहीराळेगाव तालुक्यात वाघाचे बळी वाढत असतानाच गुराख्याला ठार मारल्याने नागरिकांनी सखी कृष्णापूर येथे राळेगाव उपविभागीय अधिकाºयांचे वाहन जाळले होते. अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेनंतर सखी परिसरात वाघाचा शोध सुरू झाला. तब्बल १५ दिवस पथकाचा या ठिकाणी मुक्काम होता. ट्रॅप लावले, पिंजऱ्यामध्ये सावज सोडले. यानंतर मात्र वाघ पकडण्याची मोहीम थांबली. लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले असतानाही प्रशासनाकडून ठोस प्रयत्न झाले नाही.

टॅग्स :Tigerवाघ