शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँक आॅनलाईन परीक्षेच्या अखेर तारखा जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 22:11 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या आॅनलाईन परीक्षेसाठी अखेर मुहूर्त निश्चित झाला असून कंत्राटदार कंपनीने तारखा जाहीर केल्या आहेत. यवतमाळातील नंदूरकर विद्यालय हे या परीक्षेसाठी केंद्र राहणार आहे.

ठळक मुद्देनोकरभरती : शिपाई एक दिवस, लिपिक तीन दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या आॅनलाईन परीक्षेसाठी अखेर मुहूर्त निश्चित झाला असून कंत्राटदार कंपनीने तारखा जाहीर केल्या आहेत.यवतमाळातील नंदूरकर विद्यालय हे या परीक्षेसाठी केंद्र राहणार आहे. २० जूनला शिपाई पदासाठी आॅनलाईन परीक्षा होईल तर २१, २२ व २३ जूनला लिपिक पदासाठी आॅनलाईन परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे यांनी ‘लोकमत’ला दिली.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिकाच्या १३३ व शिपायाच्या १४ अशा १४७ जागांसाठी आॅनलाईन परीक्षेद्वारे नोकरभरती घेतली जात आहे. अमरावती येथील एका खासगी एजंसीला सहकार मंत्रालय व आयुक्तालय स्तरावरूनच नोकरभरतीचे हे कंत्राट देण्यात आले आहे. ही नोकरभरती बँकेच्या बहुतांश संचालकांसाठी व सहकारातील राजकीय-शासकीय घटकांसाठी जणू पर्वणी ठरली आहे. या भरतीच्या आड अनेक उमेदवारांनी ‘डिलिंग’ केल्याची माहिती आहे.काही संचालकांनी क्षमतेपेक्षा अधिक उमेदवारांना ‘टोकण’वर ‘शब्द’ दिल्याचे सांगण्यात येते. संचालकांच्या या हालचाली पाहता या भरतीकडे साशंकतेने पाहिले जात आहे. कुणाचा ‘कोटा’ किती यावर अद्याप एकमत झालेले नाहीत. मात्र संचालक आपल्या स्तरावर तयारी करीत आहे. परीक्षेअंती उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांची शिकार करण्याची व्यूहरचना आखली जात असल्याचीही माहिती आहे.संचालकांच्या हाती केवळ पाच गुणया परीक्षेत पाच गुण शैक्षणिक दाखल्यांवर तर पाच गुण मुलाखतीवर दिले जाणार आहे. मुलाखतीचे गुण संचालकांच्या हातात आहे. त्या बळावरच लेखी परीक्षेत चांगले गुण मिळविलेल्या उमेदवारांना हेरुन आपले काम फत्ते करण्याचा विचार या संचालकांमध्ये सुरू असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :bankबँक