यवतमाळ : शंकर महाराज आश्रम पिंपळखुटा येथे झालेल्या प्रथमेश सगणे या मातंग समाजाच्या मुलाच्या नरबळी प्रकरणी महाराजांना अटक करून आश्रम बंद करण्याबाबत अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या वतीने व मातंग समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.प्रथमेश सगणे हा मातंग समाजातील विद्यार्थी असून तो नागपूर येथे रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. त्याला उपचाराकरिता शासनाकडून दहा लाखांचा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावा व झालेल्या प्रकाराची सीआयडी मार्फत सखोल चौकशी करून दोषींना अटक करावी, अशी मागणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समिती यांच्यावतीने मनोज रणखांब, साहेबराव खडसे, संजय कांबळे, प्रा.डॉ. बी.आर. सरकटे, देवीदास महाले, अॅड. सुरज पाखरे, गणेश भांडवले, पंडित वानखडे, अशोक पांडव, अरुण खंडाळकर, अरविंद वानखडे, एम.यू. गायकवाड, अजाबराव रणखांब, प्रा. सैयद, राजाभाऊ इंगोले आदी कार्यकर्त्यांना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केले. (प्रतिनिधी)
अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे निवेदन
By admin | Updated: September 8, 2016 01:01 IST