शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अंकुर साहित्य संमेलनाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 22:08 IST

दोन दिवस विविध साहित्य प्रकरांची मेजवाणी देणाऱ्या अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलनाचा रविवारी दिमाखदार समारोप झाला. परिसंवाद, कविसंमेलन, गझल मुशायरा ऐकताना मंत्रमुग्ध झालेले हजारो श्रोते समारोपाच्या कार्यक्रमात भावूक झाले होते.

ठळक मुद्देमान्यवरांचा सत्कार : शेतकºयांच्या समस्यांवर साहित्यिक मंथन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दोन दिवस विविध साहित्य प्रकरांची मेजवाणी देणाऱ्या अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलनाचा रविवारी दिमाखदार समारोप झाला. परिसंवाद, कविसंमेलन, गझल मुशायरा ऐकताना मंत्रमुग्ध झालेले हजारो श्रोते समारोपाच्या कार्यक्रमात भावूक झाले होते.अंकुर साहित्य संघाच्या यवतमाळ शाखेतर्फे ५६ वे अखिल भारतीय अंकुर साहित्य संमेलन पार पडले. समारोपीय सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे होते. विचारमंचावर माजी मंत्री प्रा. वसंतराव पुरके, प्रा. रमाकांत कोलते, वसंतराव घुईखेडकर, अरविंद तायडे, प्रवीण देशमुख, अण्णाभाऊ डांगे, अंकुरचे केंद्रीय अध्यक्ष अरविंद भोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.अशा प्रकारचे साहित्य संमेलन पुढच्या वर्षीसुद्धा आपल्या यवतमाळनगरीमध्ये व्हावे, अशी भावना अध्यक्षीय भाषणातून माणिकराव ठाकरे यांनी बोलून दाखविली. वर्तमान परिस्थितीत शिक्षणाची अवस्था अत्यंत हलाखीची झाली आहे. त्यातच शासन इंग्रजी शाळांना मान्यता देत असल्यामुळे मातृभाषेची गळचेपी होत आहे, अशी खंत प्रा. रमाकांत कोलते यांनी व्यक्त केली. मराठी भाषा जगली पाहिजे ही भावना त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. प्रा. वसंतराव पुरके यांनी नेहमीच्या मिश्किल शैलीत प्रेक्षकांची दाद मिळविली. आपण आज ज्या उंचीपर्यंत पोहोचलो आहोत, त्यात साहित्याचाच मोलाचा वाटा आहे, असे पुरके म्हणाले.यावेळी विविध क्षेत्रात वैविध्यपूर्ण कामगिरी करणाºया मान्यवरांचा गौरवचिन्ह, मानपत्र व शाल देऊन सत्कार करण्यात आला. ज्यांच्या अथक परिश्रमाने संमेलन यशस्वी झाले, त्या खडसे दाम्पत्याचा प्रा. वसंतराव पुरके यांच्या हस्ते मनोज्ञ सत्कार करण्यात आला. सत्कार स्वीकारताना सुनिल खडसे आणि विद्याताई खडसे हे दाम्पत्य गलबलून गेले होते. विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या या संमेलनाचा मुख्य गाभा हा शेतकऱ्यांच्या समस्यांवर केंद्रित होता. परिसंवाद, कविसंमेलन, गझलमुशायरा आदी कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याचे प्रतिबिंब उमटले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास चावरे व प्रा. ताराचंद कंठाळे यांनी केले. तर आभार शहारे यांनी मानले. संमेलनाच्या यशस्वितेसाठी मनोहर शहारे, महेश अडगुलवार, सुरेश राऊत, सुरेश गांजरे, प्रा. महेश मोकडे, सुवर्णा ठाकरे, नितीन धोटे, दत्ता चांदोरे या अंकुरच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.व्यंगचित्रांचे प्रदर्शनसाहित्य संमेलनस्थळी यवतमाळ येथील प्रसिद्ध व्यंगचित्रकार सुरेश राऊत यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. कवी, साहित्यिक, चित्रकार आदींवर आधारित हे व्यंगचित्र होते. उद्घाटनानंतर उपस्थित मान्यवरांनी आणि संमेलनाच्या दोन दिवसपर्यंत नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. सुरेश राऊत यांनी या व्यंगचित्राविषयी उपस्थितांना माहिती दिली.