शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरातील अंगणवाड्या होणार स्मार्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 12:00 IST

‘सही पोषण देश रोशन’ अभियान हाती घेण्यात आले आहे. यातून राज्यभरातील अंगणवाडी स्मार्ट केल्या जात आहे.

ठळक मुद्दे२२ हजार अंगणवाडीताईंना देणार फोन विद्यार्थी उपस्थिती, सर्वेक्षण, आहाराच्या नोंदीचे आदेश

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अंगणवाडी म्हटले की डोळ्यापुढे खिचडी खाणाऱ्या विद्यार्थ्यांचे चित्र उभे राहते. या आहारातही गावोगावी राजकारण घडते. खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोषण आहार पोहचत नाही. यामुळे कुपोषणासारखे प्रश्न निर्माण होतात. हा प्रकार थांबावा म्हणून ‘सही पोषण देश रोशन’ अभियान हाती घेण्यात आले आहे. यातून राज्यभरातील अंगणवाडी स्मार्ट केल्या जात आहे. २२ हजार अंगणवाडीताईंना स्मार्टफोन पुरविण्यात आला. या फोनच्या माध्यमातून संपूर्ण माहिती तत्काळ दिल्लीत पोहचणार आहे.केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून ‘सही पोषण देश रोशन’ अभियान राबविले जात आहे. उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्रात याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. जूनअखेरपासून सीएएसची अंमलबजावणी होणार आहे. याकरिता राज्यातील २२ हजार अंगणवाडीताईंना मोफत स्मार्टफोन वितरित करण्यात येत आहे. त्यावर ‘कॉमन अप्लिकेशन सॉफ्टवेअर’ कार्यान्वीत करण्यात आले आहे. या माध्यमातून विविध कामकाज अंगणवाडीताईना पारपाडावे लागणार आहे. यामुळे अंगणवाडीचे रजिष्टर बाद होणार आहे.यामध्ये प्रामुख्याने १२ बाबींचा समावेश आहे. पोषण आहाराचे वितरण, समुदायनिहाय कार्यक्रम, कुटुंब व्यवस्थापन, गृहभेट वेळापत्रक, मुलांच्या वाढीची देखरेख, गरोदर मातांना घरपोच आहार, अंगणवाडी केंद्राचे व्यवस्थापन, किशोरवयीन मुलींची नोंद, समुदाय आधारित कार्यक्रम आदींच्या नोंदी मोबाईल अ‍ॅपमध्ये अंगणवाडीताईंना घ्याव्या लागणार आहे.

इंटरनेटसाठी ८०० रूपयेअंगणवाडीताईंना मोबाईल देताना प्रशिक्षणही दिले जात आहे. यासोबतच सहा महिन्यांकरिता नेट कनेक्टीव्हिटीचा खर्च म्हणून ८०० रूपये दिले जाणार आहे. यामध्ये संपूर्ण नोंदी भरून संकेतस्थळावर दररोज पाठवाव्या लागणार आहे. त्याची नोंद दिल्लीतील महिला बालविकास विभाग घेणार आहे.विद्यार्थ्यांसह सेल्फी पाठवाअंगणवाडीताईंना अंगणवाडी उघडतानाचा फोटो दररोज पाठवावा लागणार आहे. त्यामध्ये अद्ययावत पद्धतीने वेळीची नोंद घेतली जाणार आहे. अंगणवाडीत उपस्थित विद्यार्थ्यांचा सेल्फी घेऊन अंगणवाडीताईंना दररोज उपस्थिती पाठवावी लागणार आहे. यामुळे अंगणवाडीची वेळ, आहार, विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि सर्वेक्षण यामध्ये पारदर्शकता येणार आहे.राज्यभरातील अंगणवाडीत सीएएसची अंमलबजावणी होत आहे. या मोहिमेतून अंगणवाडीताईंना मोफत स्मार्टफोन पुरविण्यात आले आहेत. त्याचे प्रशिक्षण सुरू आहे. यावर्षीच्या सत्राच्या प्रारंभापासून राज्यात याची अंमलबजावणी होणार आहे.- दयाल जाधवकार्यक्रम समन्वयक, महिला बालविकास विभाग, यवतमाळ

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र