शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीताई आणि आरोग्यसेविका आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 21:54 IST

जिल्हाभरातील अंगणवाडीताई आणि आरोग्य सेविकांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारी येथील तिरंगा चौकात आयटकच्या नेतृत्वात धरणे दिले. यावेळी सरकारच्या धोरणाविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. मागण्यांची पूर्तता न झाल्यास संघटना अधिक तीव्र आंदोलन करणार आहे. याविषयीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले.

ठळक मुद्देमानधन नको, वेतन हवे : विविध मागण्यांसाठी तिरंगा चौकात दिले धरणे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हाभरातील अंगणवाडीताई आणि आरोग्य सेविकांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारी येथील तिरंगा चौकात आयटकच्या नेतृत्वात धरणे दिले. यावेळी सरकारच्या धोरणाविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. मागण्यांची पूर्तता न झाल्यास संघटना अधिक तीव्र आंदोलन करणार आहे. याविषयीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले.शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना मानधन नको तर वेतन द्या, वेतनात वाढ करा, किमान वेतन कायद्यानुसार ही वाढ नोंदविण्यात यावी आदी मागण्या यावेळी महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्यावतीने करण्यात आल्या. किमान १८ हजार रुपये वेतन देण्यात यावे ही प्रमुख मागणी आंदोलकांची होती.अंशकालीन स्त्री परिचरांना जिल्हा परिषदेच्या सेवेत सामावून घेण्यात यावे, त्यांना चतुर्थश्रेणीचे वेतन देण्यात यावे, किमान वेतन कायद्यानुसार अंशकालीन स्त्री परिचरांना १८ हजार रुपये वेतन देण्यात यावे, प्रमाणबध्द महागाईभत्ता, रजा, सुट्या, प्रवासभत्ता, सेवा पुस्तिका, भविष्य निर्वाह निधी देण्यात यावा. यासह विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.यावेळी संघटनेचे अध्यक्ष दिवाकर नागपुरे, कार्याध्यक्ष मेहराबानो शेख, उपाध्यक्ष दिलीप सिडाम, सहसचिव नलिनी क्षीरसागर, जिल्हा सचिव संगीता बांगडे, कुसुम ताकसांडे, प्रिया आत्राम, हबीब खॉ पठाण, सुमन गावंडे यांच्यासह अनेक महिला यावेळी उपस्थित होत्या.