शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

अंधरवाडी अद्याप अंधारातच

By admin | Updated: November 27, 2014 23:43 IST

पाटणबोरीपासून अवघ्या साडेतीन किलोमीटर अंतरावरील अंधरवाडी हे गाव अद्यापही अंधारातच चाचपडत आहे. टिपेश्वर अभयारण्याच्या बाजूला आणि निसर्गाच्या कुशीत वसलेले या गावाला

नीलेश यमसनवार - पाटणबोरीपाटणबोरीपासून अवघ्या साडेतीन किलोमीटर अंतरावरील अंधरवाडी हे गाव अद्यापही अंधारातच चाचपडत आहे. टिपेश्वर अभयारण्याच्या बाजूला आणि निसर्गाच्या कुशीत वसलेले या गावाला स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही साधा रस्ता मिळाला नाही.पाटणबोरी येथून पश्चिमेस साडे तीन किलोमीटर अंतरावरील १०० टक्के आदिवासी व गोरगरीब बांधव वास्तव्य करणाऱ्या अंधरवाडीत ५० घरांची वस्ती आहे. त्यात २७५ ते ३00 ग्रामस्थ वास्तव्य करतात. या गावाला निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्य बहाल केले आहे. निसर्गाच्या कुशीत हे गाव वसलेले आहे. मात्र विकासाचा सूर्य या गावात अद्याप पोहोचलाच नाही. विकासाची किरणे कधी उगवलीच नाही. स्वातंत्र्याच्या तब्बल ६७ वर्षानंतरही या इवलाशा गावाला साधा रस्ता नाही़ परिणामी तेथील गावकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करीत जीवन कंठावे लागत आहे. या गावाला धड रस्ता नसल्याने पावसाळ्यात तर ग्रामस्थ भंडावून जातात. त्यांची प्रचंड तारांबळ उडते. विशेषत: पावसाळ्यात कुणी आजारी पडल्यास त्याला दवाखान्यापर्यंत तरी नेता येईल किंवा नाही, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकतो. कारण पावसाळ्यात या गावाला असलेल्या सध्याच्या रस्त्यावर दोन ते तीन फूट चिखल साचतो. तो चिखल तुडवित ग्रामस्थांना पुढची वाट शोधावी लागते. त्यामुळे त्यांची प्रचंड परवड होते. तथापि या गावाला रस्ता तयार करण्यासाठी शासन आणि प्रशासन स्तरावर उदासीनताच दाखविली जाते. या छोटाश्या गावात केवळ रस्ताच नाही, तर शाळाही नाही, पाणी पुरवठा योजनाही नाही. सर्वच बाबतीत हे गाव मागासलेले आहे. आदिवासी बांधवांसाठी शासन विविध योजना आखते. त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी भरपूर निधी उपलब्ध करून देते. प्रत्यक्षात हा निधी, योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याचे या गावावरून दिसून येते. परिणामी हा निधी, योजना कुठे जातात, असा प्रश्न निर्माण होतो. देशाच्या मुख्य प्रवाहात यावे, असे त्यांनाही वाटते. या लहान गावाकडे कुणाचेच लक्ष नाही. त्यामुळे तेथील ग्रामस्थ अद्यापही गावात विकासाचा सूर्य कधी उगवेल, याच विवंचनेत आहे. शासनाने किमान रस्ता द्यावा, गावात शुद्ध पाणी पुरवठ्याची व्यवस्था करावी, एवढ्याच त्यांच्या माफक अपेक्षा आहेत. मात्र स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांनंतरही कोणत्याच शासनाला त्या पूर्ण करता आल्या नाहीत. विशेष म्हणजे केळापूर-आर्णी हा विधानसभा मतदार संघ अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असताना गावाची फरफट सुरूच आहे.