‘युफोरिया : विद्यार्थी व कर्मचारी पुरस्कार वितरण यवतमाळ : मराठी-हिंदी चित्रपट सृष्टीतील हरहुन्नरी अभिनेता, ‘गोलमाल रिटर्न’चा ‘लक्ष्मण’ श्रेयस तळपदे आणि ‘नटरंग’मधील ‘वाजले की बारा’ या गाण्याने मराठी श्रोत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणारी अभिनेत्री अमृता खानविलकर जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी गुरुवार, २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता संवाद साधतील. जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘युफोरिया-२०१५’ या चार दिवशीय वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्नेहसंमेलनाच्या तिसऱ्या दिवशी सर्वोत्तम विद्यार्थी व सर्वोत्तम कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जवाहरलाल दर्डा एज्यूकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष खासदार विजय दर्डा राहणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते श्रेयस तळपदे आणि प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर उपस्थित राहतील. (नगर प्रतिनिधी)
अमृता खानविलकर, श्रेयस तळपदे आज ‘जेडीआयईटी’त
By admin | Updated: January 28, 2015 23:41 IST