शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
3
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
4
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
5
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
6
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
7
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
8
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
9
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
10
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
11
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
12
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
13
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
14
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
15
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
16
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
17
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
18
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
19
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
20
Crime: विधवा वहिनीच्या बेडरूममध्ये घुसून दीराचं घाणेरडं कृत्य, गुन्हा दाखल!

अमृताच्या अदांनी ‘वाजले की बारा’

By admin | Updated: January 29, 2015 23:14 IST

ती माईकवर आली... काय राव काय म्हणता... शब्द उच्चारताच एकच जल्लोष झाला... विद्यार्थ्यांचा आग्रह... तोही नृत्याचा... काही क्षण स्तब्ध... क्षणातच ती स्टेजच्या मधोमध आली...

‘जेडीआयईटी’चे युफोरिया-१५’ : जितेंद्रची फटके‘बाजी’ तर श्रेयसचा सल्लायवतमाळ : ती माईकवर आली... काय राव काय म्हणता... शब्द उच्चारताच एकच जल्लोष झाला... विद्यार्थ्यांचा आग्रह... तोही नृत्याचा... काही क्षण स्तब्ध... क्षणातच ती स्टेजच्या मधोमध आली... आणि सुरू झाले लावणी नृत्य... ‘आता वाजले की बारा’... जिन्स पँट आणि शर्ट घातलेल्या अमृताने दिलखेच नृत्य करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.निमित्त होते जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित ‘युफोरिया-१५’ या स्नेहसंमेलनाचे. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर, चित्रपट अभिनेता व निर्माता श्रेयस तळपदे, आणि हरहुन्नरी कलावंत जितेंद्र जोशी यांनी स्नेहसंमेलनाच्या तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांसोबत धमाल केली. ‘आता वाजले की बारा’ या लावणीने घराघरात पोहोचलेल्या अमृताला नृत्याचा आग्रह झाला नसता तर नवलच. विद्यार्थ्यांनी टाळ्या आणि शिट्ट्यांच्या गजरात अमृताचे स्वागत करत लावणी नृत्याचा आग्रह धरला. हो-नाही करत ती एकदाची तयार झाली आणि तिची पावले मग थांबलीच नाहीत. ‘फॅशन शो’साठी तयार केलेल्या निमुळत्या रॅम्पवर तिच्या पदलालित्याने सर्वजण भारावून गेले. ‘आता वाजले की बारा’ या लावणीची साईन ट्यून सुरू झाली तेव्हा तिची मोहक अदा विद्यार्थी डोळ्यात साठवून घेत होते. काही कळायच्या आतच नृत्य करत अमृता चक्क स्टेजच्या खाली उतरली आणि विद्यार्थ्यांमध्ये शिरून नृत्य करायला लागली. तेवढ्याच उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांनीही तिच्यासोबत ठेका धरला. विशेष म्हणजे, अमृताला आदल्या दिवशी ताप आला होता. प्रकृती ठीक नसतानाही विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव तिने ठेकाच धरला नाही तर अख्खी लावणी आपल्या नृत्याने जिवंत केली. या लावणीनंतर जितेंद्र जोशी माईकवर आला. ‘पोट्टी अशी नाचून राह्यली की मले वाटलं आता फायर ब्रिगेडच बोलवावं लागल’ असे म्हणताच पुन्हा टाळ्या आणि शिट्ट्या सुरू झाल्या. अमृताला लाख रुपये जरी कुणी दिले तरी ती अशी स्टेजवर नाचली नसती. मात्र तुमचा उत्साह पाहून तिलाही राहावले नाही, असे जितेंद्र म्हणाला. ‘मेव्हणे मेव्हणे मेव्हण्यांचे पाव्हणे’ हा संवाद जितेंद्रने सादर करून आगामी ‘बाजी’ चित्रपटाबद्दल सांगितले. ‘बाजी’ चित्रपटात श्रेयस तळपदे यांनी डुप्लिकेटचा वापर न करता घोड्यावरून रपेट मारतानाचे दृश्य चित्रित करताना घडलेला प्रसंग सांगितला. या चित्रपटात जितेंद्र खलनायक मार्तंडची भूमिका वठवित आहे. या चित्रपट निर्मितीत आलेल्या गमतीजमती सांगतानाच जितेंद्रचा मोठेपणाही दिसून आला. सदर महाविद्यालयातील मंगेश सावळकर या विद्यार्थ्याची ‘सिग्नेट’ या स्मरणिकेतील ‘ऐश्वर्या आली भेटाले’ ही कविता संपूर्ण वाचून दाखविली. एवढेच नाही तर त्याचे कौतुक करीत प्रत्येक क्षेत्रात एक ‘बाजी’ असतो आणि तो ओळखला पाहिजे, असेही सांगितले. ‘हंबरून वासराले चाटते जवा गाय’ ही कविता सादर केली तेव्हा संपूर्ण वातावरण धीरगंभीर झाले होते. श्रेयस तळपदे म्हणाला, विद्यार्थ्यांच्या जीवनात महाविद्यालयीन शिक्षण महत्त्वाचे असते. तुमचा उत्साह पाहूण आपण उगाचच पासआऊट झालो असे वाटते, नाहीतर याच महाविद्यालयात शिकायला आलो असतो. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर संधी ओळखली पाहिजे. त्या संधीचे सोने केले पाहिजे, विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षकांचाही मोठा सहभाग असतो, असे सांगितले. ‘आपल्याशी नडेल तो नरकात शिरेल’ हा आगामी ‘बाजी’ चित्रपटातील संवाद म्हणत त्याने विद्यार्थ्यांचा निरोप घेतला. (नगर प्रतिनिधी)