शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
3
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
4
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
5
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
6
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
7
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
8
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
9
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
10
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
11
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
12
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
13
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
14
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
15
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
16
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
17
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
18
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
19
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
20
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण

आॅफलाईन वेतनाने वाढला प्रचंड गोंधळ

By admin | Updated: January 31, 2015 23:28 IST

सन २०१३-१४ च्या संचमान्यतेनुसार शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरले. त्यामुळे एकाच शाळेत कर्मचाऱ्यांचे वेतन काढताना काहींचे आॅनलाईन, तर अतिरिक्तचे वेतन

वणी : सन २०१३-१४ च्या संचमान्यतेनुसार शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरले. त्यामुळे एकाच शाळेत कर्मचाऱ्यांचे वेतन काढताना काहींचे आॅनलाईन, तर अतिरिक्तचे वेतन आॅफलाईन काढले जात आहे. दोन्ही प्रकारचे वेतन एकाच वेळी खात्यात जमा होत नसल्याने इतर कपातीची रक्कम भरताना शाळा प्रमुख गोंधळात पडत आहे. या प्रक्रियेमुळे कर्मचाऱ्यांचे वेतन दोन महिने उशिरा होत असल्याने शिक्षक व कर्मचाऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.अनुदानित शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन शालार्थ प्रणालीद्वारे काढले जाते. सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांची या प्रणालीमध्ये आॅनलाईन नोंदणी झाली आहे. मात्र यावर्षीच्या सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात शाळांची सन २०१३-१४ या वर्षाची संचमान्यता करण्यात आली. त्यामध्ये विद्यार्थी संख्या कमी झाल्याने काही शाळांतील शिक्षक अतिरिक्त ठरले. तसेच प्रयोगशाळा परिचर व नाईक ही पदे व्यपगत झाल्याने त्यांनाही अतिरिक्त ठरविण्यात आले.या कर्मचाऱ्यांचे डिसेंबर १४ पर्यंतचे वेतन आॅफलाईन काढण्यात यावे व तोपर्यंत त्यांची समायोजनाची प्रक्रिया पूर्ण पाडून जानेवारी १५ या महिन्याचे वेतन आॅनलाईन काढण्यात यावे, असे परिपत्रक शालेय शिक्षण विभाग व राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी २० आॅक्टोबर २०१४ ला काढले होते. मात्र काही संघटना न्यायालयात गेल्याने समायोजन प्रक्रिया रखडली. त्यामुळे अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे जानेवारीचे वेतनही आॅफलाईनच काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आॅनलाईन व आॅफलाईन दोन्ही पध्दतीने काढलेली वेतन देयके एकाच वेळी बँकेत जमा होत नसल्याने एकाच शाळेतील कर्मचाऱ्यांच्या इतर कपातीची रक्कम, आयकर, विमा, पतसंस्था या ठिकाणी दोन वेळा भरावी लागते. त्यामुळे रोकडवही लिहीतानाही त्रास होतो. आॅफलाईनचे वेतन बरेच उशिरा जमा होत असल्याने एकाच शाळेतील काही कर्मचाऱ्यांचे वेतन आधी व काहींचे नंतर, अशी स्थिती निर्माण झाली आहे. ही अवस्था येत्या मार्च महिन्यापर्यंतही चालणारच आहे, असे संकेत प्राप्त होत आहे.शाळाअंतर्गत पदोन्नती व समायोजनालासुध्दा परवानगी दिली जात नाही. यामुळे काही शाळांमध्ये शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या अनेक जागा रिक्त आहेत. त्यामुळे शाळा प्रमुखांना शालेय कामकाज चालविणे कठीण झाले आहे. सोबतच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यावरही विपरीत परिणाम पडत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)