शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
7
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
8
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
9
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
12
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
13
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
14
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
15
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
16
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
17
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
18
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
19
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
20
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...

साथीतही हापकीनचे औषध आले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 21:31 IST

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला औषधी पुरवठ्याचे कंत्राट ‘हापकीन’ला देण्यात आले होते. त्यासाठी दीड कोटी वर्गही केले गेले. एमआयआर मशीनसाठीही १३ कोटी वेगळे देण्यात आले. मात्र त्यानंतरही हापकीन महामंडळाने पावसाळ्यात साथीचे थैमान सुरू असतानासुद्धा औषधी पुरवठा केला नाही.

ठळक मुद्देकंपनीला दीड कोटींच्या औषधीचा विसर : एमआरआय मशिनचे १३ कोटी अडकले

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला औषधी पुरवठ्याचे कंत्राट ‘हापकीन’ला देण्यात आले होते. त्यासाठी दीड कोटी वर्गही केले गेले. एमआयआर मशीनसाठीही १३ कोटी वेगळे देण्यात आले. मात्र त्यानंतरही हापकीन महामंडळाने पावसाळ्यात साथीचे थैमान सुरू असतानासुद्धा औषधी पुरवठा केला नाही.संपूर्ण जिल्ह्यात साथरोगाने थैमान घातले आहे. या रोगाला नियंत्रित करण्यासाठी स्थानिक पातळीवरून औषधांची खरेदी के ली जात आहे. या व्यतिरिक्त लागणाऱ्या औषधांचा पुरवठा करण्याची जबाबदारी हापकीन महामंडळाला देण्यात आली होती. वर्षभराच्या औषधांचा करारही केला. मात्र प्रत्यक्षात ही औषधी वैद्यकीय महाविद्यालयाला पाठविलीच गेली नाही. राज्यभरातच ही स्थिती असल्याची गंभीरबाब पुढे आली आहे. याचा फटका सर्वसामान्य रुग्णांना बसतो आहेत.जिल्ह्यामध्ये अपघातग्रस्तांचे निदान करताना एमआरआय मशीन महत्वाची आहे. त्याची मागणी वैद्यकीय महाविद्यालयाकडून करण्यात आली आहे. त्याकरिता साडेतेरा कोटी रूपयांचा निधी हापकीन महामंडळाकडे वळता करण्यात आला. यानंतरही हापकीनने वैद्यकीय महाविद्यालयाला एमआरआय मशीन पाठविलीच नाही. यामुळे जिल्ह्यातील रूग्णांना उपचारासाठी दुसºया जिल्ह्यावरच विसंबून रहावे लागत आहे. हापकीनकडून औषधी पुरवठा न होण्यामागील नेमकी कारणे काय? हे अस्पष्ट आहे. लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.जिल्ह्यात डायरियाचे १३४३ रुग्णजिल्ह्यात एप्रिलपासून डायरियाचे रूग्ण वैद्यकीय महाविद्यालयात भरती होत आहे. दरमहिन्यालाच डायरीचे रूग्ण दाखल होत आहे. आतापर्यंत १३४३ रूग्णावर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात आले. कॉलराचे ११० रूग्ण भरती करण्यात आले. तर ३१ आॅगस्टपासून स्क्रब टायफसचे ५४ रूग्ण आणि सप्टेंबरपासून डेंग्यूचे ६४ रूग्ण दाखल झाले आहेत.फवारणी विषबाधितांचा आकडा पोहोचला १४० वरजुलैपासून फवारणीमुळे विषबाधा झालेल्या शेतकरी आणि शेतमजुरांचा आकडा १४० वर पोहोचला आहे. यातील दोन विषबाधित रूग्ण सध्या उपचार घेत असून इतरांना उपचाराअंती सुटी देण्यात आली.साथरोगाचे मोठे आक्रमण झाले आहे. या साथीला नियंत्रित करण्यासाठी स्थानिक स्तरावर औषधांची खरेदी करण्यात आली. साथरोग नियंत्रणासाठी वैद्यकीय महाविद्यालयाची यंत्रणा पूर्णत: प्रयत्न करीत आहे.- मनीष श्रीगिरीवारअधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय