शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

आयुर्वेद दुकानात अ‍ॅलोपॅथी औषधी

By admin | Updated: September 28, 2015 02:44 IST

आयुर्वेदिक औषधी विक्रीच्या परवान्यावर अ‍ॅलोपॅथीची औषधी विक्री करणाऱ्या येथील गेडामनगर परिसरातील तुळजाई मेडिकल स्टोअर्सवर औषधी प्रशासन विभागाने धाड ...

साठा जप्त : गेडामनगर परिसरात कारवाईयवतमाळ : आयुर्वेदिक औषधी विक्रीच्या परवान्यावर अ‍ॅलोपॅथीची औषधी विक्री करणाऱ्या येथील गेडामनगर परिसरातील तुळजाई मेडिकल स्टोअर्सवर औषधी प्रशासन विभागाने धाड टाकून कारवाई केली. वर्षभरापूर्वी या दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द केल्यानंतरही येथून अ‍ॅलोपॅथीची औषधी विकली जात होती.तुळजाई मेडिकल स्टोअर्सचे संचालक बाबुराव गोविंदराव कदम आणि केशव शिवानंद जायभाये यांनी भागिदारीत दुकान सुरू केले. मात्र त्याच्या या दुकानावर १ जून २०१४ मध्ये कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडे नियमित फार्मासिस्ट उपस्थित नव्हता, विनाबिलाने औषधी विक्री होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे अन्न व औषधी प्रशासन यवतमाळाचे सहाय्यक आयुक्त अमृत निखाडे यांनी सदर दुकानाचा औषध विक्रीचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला होता. मात्र त्यानंतर येथे तुळजाई आयुर्वेदिक पतंजली औषधी दुकान सुरू करण्यात आले. आयुर्वेदिक औषधीच्या नावाखाली या दुकानातून सर्रास अ‍ॅलोपॅथीची औषधी विक्री केली जात होती. यावर पाळत ठेवून औषधी निरीक्षक प्रवीण राऊत आणि अजय माहुले यांनी शुक्रवारी रात्री या दुकानात धाड घातली. तेव्हा येथे प्लास्टिक पिशवीमध्ये लपवून ठेवलेले अ‍ॅलोपॅथीचे औषधी आढळली. तब्बल २७ हजारांचा मुद्देमाल या दुकानातून जप्त करण्यात आला. कोणताही परवाना नसताना औषधांची विक्री केल्याबद्दल या दुकान मालकाविरोधात अन्न व औषधी कायदानुसार न्यायालयात खटला दाखल केला जाणार आहे. शिवाय या दुकानदाराला अ‍ॅलोपॅथी औषधी पुरविणाऱ्याचाही शोध औषध निरीक्षक घेत आहेत, अशा प्रकाराचे मोठे रॅकेट उघडकीस आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातील दोषींविरूध्द कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सहायक आयुक्त अमृत निखाडे यांनी दिली. (कार्यालय प्रतिनिधी)