शहरातून उपचार : शेतकऱ्यांना घ्यावा लागतो खासगी डॉक्टरांचा आधारउमरखेड : वातावरण बदलाचा जनावरांवरही परिणाम होत असून अनेक जनावरे आजारांना बळी पडत आहे. अशा परिस्थितीत उमरखेड तालुक्यातील शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी मात्र उमरखेड शहरात बसून कागदोपत्रीच जनावरांवर उपचार करीत आहेत. परिणामी शेतकऱ्यांना आपली जनावरे खासगी पशुवैद्यकाकडे न्यावी लागते.उमरखेड तालुक्यात ढाणकी, जेवली, चिखली, कोरटा अशी चार पशुवैद्यकीय दवाखाने आहे, तर मुळावा, पळशी, विडूळ, देवसरी, दराटी, चातारी, ब्राह्मणगाव, बिटरगाव, मोरचंडी येथे श्रेणी-२ चे दवाखाने आणि ढाणकी व उमरखेड येथे फिरते पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. मात्र या ठिकाणी जनावरांवर उपचार तर सोडा लसीकरण, कृत्रिम रेतन, खच्चीकरण, शस्त्रक्रिया, वंध्यत्व तपासणी आदी उपचारही केले जात नाही. या सर्व प्रकाराने शेतकरी त्रस्त झाले आहे. अलीकडे दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे परंतु जनावरांना आजार झाल्यास त्याच्या उपचारासाठी डॉक्टरच मिळत नाही. त्यामुळे पैसे देवून उपचार करावे लागते. तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे नियंत्रण नसल्याने शासनाच्या पशुधन विकासाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. या प्रकाराकडे वरिष्ठांनी लक्ष देवून जनावरांवर उपचार होण्यासाठी उपाय योजावे, अशी मागणी आहे. सध्या परिसरात जनावरांमध्ये रोगाची लक्षणे दिसत आहेत. अनेक शेतकरी शासकीय पशुचिकित्सालयात जनावरांना नेतात. परंतु तेथे कोणीही उपस्थित नसते. (शहर प्रतिनिधी)
उमरखेड तालुक्यातील पशुवैद्यकांना पशुचिकित्सालयाची ‘अॅलर्जी’
By admin | Updated: August 2, 2015 02:29 IST