शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

आर्णी-सावळी रस्त्याच्या कामात कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

By admin | Updated: April 23, 2017 02:31 IST

आर्णी-सावळी रस्त्याच्या बांधकामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत जिल्हाधिकारी

अभियंत्यांविरुद्ध तक्रार : संरक्षक भिंत न बांधताच हडपले १८ लाख यवतमाळ : आर्णी-सावळी रस्त्याच्या बांधकामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत जिल्हाधिकारी आणि आर्णी पोलीस ठाण्यात सेंटर फॉर अवेअरनेस, जस्टिस अँन्ड ह्युमन राईटस्चे संचालक प्रा. डॉ. प्रदीप राऊत यांनी तक्रार केली आहे. परंतु महिना उलटूनही आर्णी पोलिसांकडून कोणतीही कारवाई नाही. रस्ते विकास योजना २००१ ते २०२१ अंतर्गत विशेषत: आदिवासी व नक्षलग्रस्त भागात बांधलेल्या जिल्हा व तालुका जोडणाऱ्या आणि आंध्रप्रदेश महाराष्ट्र राज्यातील वाणिज्यिक हालचालींना चालना मिळून नागरिकांना सुरक्षितता प्रदान करण्याच्या उदात्त हेतुने हा रस्ता बांधण्यात आला आहे. प्रती किमी ४० लाख रुपये प्रमाणे नऊ कोटी रुपये खर्च करून २२ किमीच्या रस्त्याची अवघ्या ९० दिवसातच दुरावस्था होऊन नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणी विशेष प्रकल्प बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे २३ सप्टेंबर २०१६ रोजी प्रथम तक्रार दाखल करून समिती गठित करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आॅगस्ट २०१६ मध्ये समिती गठित करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी चौकशी करून सप्टेंबरमध्ये अहवाल सादर केला. क्षतिग्रस्त कारपेट सिलकोट व अत्यंत क्षतिग्रस्त झालेला रस्ता आणि ४७५ ऐवजी २८० मि. मि. चा टाकलेला अत्यल्प खडीचा थर आदी बाबींसह अनेक भ्रष्ट बाबी अहवालातून उघड झाल्या. प्रकरणी डॉ. राऊत यांनी बांधकाम उपविभाग आर्णीचे उपविभागीय अभियंता एस. एस. श्रावगी, शाखा अभियंता आर. एस. गिरनाळे आणि कंत्राटदार असलेल्या कंस्ट्रक्शन कंपनीविरुद्ध जिल्हाधिकारी आणि आर्र्र्र्र्णी पोलीस ठाण्यात १३ आरोपांची गंभीर तक्रार केली. सदर रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाल्याने आमदार राजू तोडसाम यांनी आॅगस्ट १६ मध्ये अमरावती विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे तक्रार करून सात आॅगस्टला याच रस्त्यावर तरुणाचा मृत्यू झाल्याची बाब निदर्शनात आणून सबंधितांवर फौजदारीची मागणी केली आहे, तर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनीही कंत्राटदारावर कारवाई आणि रस्त्याची तत्काळ दुरुस्ती झाल्याशिवाय देयक अदा करू नये, अशा सूचना केल्या आहेत. शासनाच्या मानकानुसार काम न झाल्याने व डांबरीकरणासंदर्भात शासनाने २००८ मध्ये केलेल्या तरतुदींचा सबंधितांनी भंग केल्याने संगणमताने झालेल्या या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची तक्रार प्रा. डॉ. प्रदीप राऊत यांनी केली आहे. (प्रतिनिधी)