शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘मेडिकल’चे सर्वच वाॅर्ड हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2021 05:00 IST

विभागाच्या इमारतीचे काम रखडले आहे. यात १२० खाटा बालरोग विभागाच्या आहेत.  पालकमंत्री संदिपान भुमरे, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वत: फेज-३ मधील इमारत वेळेत पूर्ण व्हावी यासाठी निर्देश दिले. स्वत: त्यांनी या बांधकामाची पाहणी केली. मात्र दीड वर्षापासून इमारत बांधकामाचा रखडलेला निधी अद्याप पावेतो मिळालेला नाही. त्यामुळे कंत्राटदारानेही नाईलाजास्तव कामाची गती मंद केली आहे. महामारीचे संकट असताना केवळ थोड्या कामासाठी तयार इमारत वापरता आणता येत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बालरुग्ण विभागात ८९ खाटा उपलब्ध आहेत. तेथे १८९ बालक उपचारार्थ दाखल आहेत. मुलांमध्ये व्हायरल फिवर, डेंग्यू सदृश ताप ही आजाराची लक्षणे आहेत. याचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत.  यासोबतच मेडिसीन, स्त्रीरोग विभाग पूर्णत: हाऊसफुल्ल झाला आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून जुन्या इमारतीत असलेला बालरोगचा  वॉर्ड पूर्ववत सुरू करण्याचा प्रयत्न मेडिकल प्रशासन करीत आहे. नव्या २८८ खाटांचे स्त्री रुग्णालय व बालरोगविभागाच्या इमारतीचे काम रखडले आहे. यात १२० खाटा बालरोग विभागाच्या आहेत.  पालकमंत्री संदिपान भुमरे, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वत: फेज-३ मधील इमारत वेळेत पूर्ण व्हावी यासाठी निर्देश दिले. स्वत: त्यांनी या बांधकामाची पाहणी केली. मात्र दीड वर्षापासून इमारत बांधकामाचा रखडलेला निधी अद्याप पावेतो मिळालेला नाही. त्यामुळे कंत्राटदारानेही नाईलाजास्तव कामाची गती मंद केली आहे. महामारीचे संकट असताना केवळ थोड्या कामासाठी तयार इमारत वापरता आणता येत नाही. ही अडचण शासन स्तरावर सोडविणे गरजेचे आहे. अडचणीच्या काळातही रुग्णालयाचा निधी तातडीने मिळण्यासाठी पाठपुरावा झाला, प्रतिसाद मात्र मिळाला नाही. तब्बल सहा कोटी ५० लाखांची देयके रखडली असल्याने हे काम थांबले असल्याचे सांगितले जाते.  रुग्णालयाची इमारत वेळेत पूर्ण व्हावी याचा कोविड काळात सातत्याने पाठपुरावा केला जात होता. नंतर मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सध्या बालरुग्ण विभागात एका बेडवर तीन ते चार बालकांना ठेवण्याची वेळ आली आहे. याशिवाय इतरही विभागाचे वॉर्ड पूर्णत: भरलेले आहेत. बरेचदा जागा उपलब्ध होत नसल्याने दाखल होऊन उपचार घेण्याची गरज असलेल्या रुग्णांनासु्द्धा परत जावे लागत आहे. 

कंत्राटदाराची जवळपास साडेतीन कोटींचे देयके थकली आहे. मात्र त्यानंतरही अत्यावश्यक सेवा म्हणून फेज-३ मधील बालरोग वाॅर्ड पूर्णत: तयार झाला आहे. तो केव्हाही वापरात घेऊ शकतात. इमारतीची केवळ बाह्य छपाईचे काम सुरू आहे. पैसे नसल्याने कंत्राटदाराने कामाची गती कमी केली आहे.                          

- मुकुंद कचरेकार्यकारी अभियंता बांधकाम विभाग, यवतमाळ 

 

टॅग्स :Medicalवैद्यकीयHealthआरोग्य