शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीचे सर्व शेड तुरीने फुल्ल

By admin | Updated: May 23, 2017 01:22 IST

नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून येथील बाजार समितीच्या यार्डात शेतकऱ्यांची तूर विक्रीसाठी झुंबड उडाली आहे.

राळेगाव : ८५४ शेतकऱ्यांना मोजणीची प्रतीक्षा, समिती सज्जलोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून येथील बाजार समितीच्या यार्डात शेतकऱ्यांची तूर विक्रीसाठी झुंबड उडाली आहे. त्यामुळे सर्व शेड आणि ओटे हाऊसफुल्ल झाले आहेत. आता बाजार समितीत शेतकऱ्यांची तूर उतरविण्यासाठी जागाच शिल्लक राहिली नाही. त्यामुळे तूर विक्रीकरिता केवळ नोंदणी केली जात आहे. मोबाईल क्रमांकासह आवश्यक ती इतर माहिती नोंदवून घेतली जात आहे. जागा उपलब्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांना तुरी विक्रीसाठी आणण्याकरिता सूचना केली जाणार आहे. बाजार समितीत असलेल्या तुरीचा काटा करण्यास विलंब लागणार आहे. पुढे पावसाची शक्यता लक्षात घेता तूर ओली होणार नाही याची दक्षता बाजार समितीस्तरावर घेतली जाणार आहे. आतापर्यंत बाजार समितीत ८५४ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आणली आहे. एकूण चार काट्यांवर दररोज तुरीची तोलाई होत आहे. नाफेडच्या निकषाप्रमाणे खरेदी करताना चाळणी लावून मोजणी केली जात आहे. काही शेतकरी मागील चार ते पाच दिवसांपासून मुक्कामी आहेत. सद्यस्थितीत १५ हजार क्विंटलहून अधिक तूर विक्रीसाठी आली आहे.चुकाऱ्यास विलंबाची शक्यतानाफेडने तुरीची खरेदी सुरू केली. परंतु चुकाऱ्यास विलंब होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांची तूर खरेदी केल्यानंतर वेअर हाऊसला जमा केली जाते. यानंतरची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम आॅनलाईन जमा केली जाते. यासाठी किमान दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो, अशी स्थिती आहे. या बाबीला नाफेडचे अधिकारी कारभारी शिंदे यांनीही दुजोरा दिला आहे. शेतकऱ्यांची तूर सुरक्षित - प्रफुल्ल मानकरबाजार समितीच्या यार्डात असलेली शेतकऱ्यांची सर्व तूर सुरक्षित आहे. बाजार समितीने त्यादृष्टीने सुरक्षा व्यवस्था केली आहे. शेतकऱ्यांना त्रास होवू नये यासाठी केवळ नोंदणी केली जात आहे. तूर विक्रीसाठी आणण्याविषयी त्यांना मोबाईलसह इतर माध्यमातून सूचना दिल्या जाणार आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर यांनी दिली.