शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्तीच्या रांगेत सव्वा लाख शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 06:00 IST

१ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत थकीत असलेल्या कर्ज खात्यांना कर्जमुक्ती योजनेमध्ये सहभागी करून घेतले जात आहे. या निकषानुसार जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांचा अहवाल बँकांनी तयार केला आहे. बँकाच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात या निकषात बसणारे सव्वा लाख शेतकरी राहण्याचा अंदाज आहे. त्यांच्याकडे ७२२ कोटींचे कर्ज थकलेले आहेत.

ठळक मुद्दे७२२ कोटींच्या थकबाकीचे अंकेक्षण : थकबाकीदारांना दिलासा

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील सव्वा लाख शेतकऱ्यांच्या थकबाकी खात्यांची नोंद झाली आहे. निकषानुसार या खात्यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. या शेतकऱ्यांकडे ७२२ कोटींचे कर्ज थकलेले आहे. या याद्यांचे अंकेक्षण करण्यासाठी बँकांनी लेखा परिक्षकांकडे या सुपूर्द करण्याचे काम सुरू केले आहे.१ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत थकीत असलेल्या कर्ज खात्यांना कर्जमुक्ती योजनेमध्ये सहभागी करून घेतले जात आहे. या निकषानुसार जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांचा अहवाल बँकांनी तयार केला आहे. बँकाच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात या निकषात बसणारे सव्वा लाख शेतकरी राहण्याचा अंदाज आहे. त्यांच्याकडे ७२२ कोटींचे कर्ज थकलेले आहेत.थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या बँकांनी तयार करून अंकेक्षण करण्यासाठी अंकेक्षकाकडे सादर केल्या आहेत. १५ जानेवारीपर्यंत कर्जमाफीतील शेतकऱ्यांचे चित्र स्पष्ट होणार आहे. ही प्रक्रिया आटोपल्यानंतर १ फेब्रुवारीला कर्जमुक्तीच्या यादीत समाविष्ट झालेल्या शेतकऱ्यांचे नाव पोर्टलवर प्रसिद्ध होणार आहेत. या याद्यातील शेतकऱ्यांच्या विशेष नंबरवर प्रसिद्ध झालेल्या खात्याला शेतकऱ्यांना थम्बद्वारे अप्रूव्हल द्यायचे आहे. यानंतर कर्ज प्रक्रिया अंतिम होणार आहे.तत्पूर्वी ज्या शेतकऱ्यांचे खाते आधार लिंक नाही, त्या शेतकऱ्यांच्या याद्या १५ जानेवारीपर्यंत अद्ययावत करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. जिल्ह्यातील दोन हजार ४० गावांमध्ये या याद्या लावल्या जात आहेत. ग्रामपंचायत, सहकारी संस्था, बँका, तलाठी कार्यालयात याद्या लावल्या जाणार आहेत.आधार लिंक नसणाऱ्या शेतकऱ्यांनी आपले खाते आधार लिंक करावे. यामुळे कर्जमुक्तीच्या प्रक्रियेत अशा शेतकऱ्यांना सहभागी करता येणार आहे. कर्जमुक्ती प्रक्रियेचे कामकाज युद्धपातळीवर सुरू आहे.- अर्चना माळवेजिल्हा उपनिबंधक, यवतमाळ

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरी