शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
5
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
6
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
7
Operation Sindoor : जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
8
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
9
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
10
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
11
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
12
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
13
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
14
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
15
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
16
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
17
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
18
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
19
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
20
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  

राष्ट्रीयीकृत बँकांच्या मुजोरीपुढे सर्वच हतबल

By admin | Updated: July 15, 2016 02:34 IST

राष्ट्रीयकृत बँकांच्या पीककर्ज वाटपातील मुजोरीपुढे सरकार, प्रशासनाने हात टेकले आहे.

पीककर्ज वाटप : शेतकरी मिशन देणार दिल्लीत धडक यवतमाळ : राष्ट्रीयकृत बँकांच्या पीककर्ज वाटपातील मुजोरीपुढे सरकार, प्रशासनाने हात टेकले आहे. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनने बँकांच्या या भूमिकेबाबत पुढील आठवड्यात थेट दिल्लीत धडक देण्याची तयारी चालविली आहे. जिल्हा प्रशासनाने सहकारी बँका व राष्ट्रीयकृत बँकांना पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करून दिले होते. सहकारी बँकांनी हे उद्दिष्ट जवळपास गाठले असले तरी राष्ट्रीयकृत बँका अद्याप अर्ध्यावरही पोहोचलेल्या नाही. या बँकांचे कर्ज वाटप अवघे ४० टक्क्यांवर आहे. त्यातही सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक आॅफ इंडिया सर्वात मागे असल्याचे सांगितले जाते. एसबीआयला ४७० कोटींच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले गेले होते. परंतु या बँकेने केवळ १७० कोटी रुपयांचे वाटप केले. खरीप हंगामाची पेरणी आटोपली असताना ही बँक उर्वरित २०० कोटींचे कर्ज केव्हा वितरीत करणार, असा सवाल आहे. युनियन बँकेबाबत शेतकऱ्यांच्या मोठ्या तक्रारी आहे. या बँकेत शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप आहे. पीककर्ज वाटपासाठी ३१ मे ही अंतिम तारीख होती. त्यानंतर ३१ जून व आता ३१ जुलै उजाडतेय, तरीही बँका पेरणीसाठी पैसे देत नसल्याचे चित्र आहे. राष्ट्रीयकृत बँकांकडून प्रत्येकवेळी रिझर्व्ह बँकेची नियमावली पुढे केली जात आहे. एक कोटींच्या शेताचा मालक असलेल्या शेतकऱ्याला एक लाखाचे कर्ज देण्यासाठी ऐवढे हेलपाटे का, असा सवाल विचारला जात आहे. पीककर्ज वाटपाबाबत राष्ट्रीयकृत बँकांच्या कठोर व मुजोर धोरणापुढे मंत्री, आमदार, प्रशासन असे सर्वच घटक हतबल झाले आहे. खास शेतकऱ्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनीही बँकांच्या या भूमिकेबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रीयकृत बँकांचे पीककर्ज वाटपाचे प्रमाण वाढावे, नव्या शेतकऱ्यांना कर्ज देता यावे, यासाठी आपण प्रयत्नरत असल्याचे तिवारी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. राष्ट्रीयकृत बँका कर्ज देण्याऐवजी शेतकऱ्यांवर हात उगारत आहेत. बँकांमुळेच शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचे तिवारी म्हणाले. ३१ मे ही कर्ज वाटपाची शेवटची तारीख असताना या तारखेपर्यंत राष्ट्रीयकृत बँकांनी पीककर्जाचे वाटपच सुरू केले नव्हते, अशी माहितीही तिवारी यांनी दिली. (जिल्हा प्रतिनिधी)