शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

टक्कल पाहून साऱ्या पोरी हसल्या, मले वाटलं साऱ्याच कशा फसल्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 21:22 IST

वऱ्हाडी कवितांनी पुसदकरांना पोट धरून हसविले. निमित्त होते. होळीच्या रंगारंग रंगोत्सव कार्यक्रमाचे. पतंजली योग परिवाराच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. युवा भारत पुसद तालुका प्रभारी प्रवीण मस्के यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम झाला.

ठळक मुद्देपुसदमध्ये रंगारंग रंगोत्सव : निसर्गरम्य वातावरणात कविता, नकला, मिमिक्री

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद :टक्कल तसंच घेऊनमी कॉलेजात गेलोमले वाटलं जसंमी लंडनला आलोटक्कल माहा पाहूनसाऱ्या कॉलेजच्या पोरी हसल्यामले वाटलं एका दमातसाऱ्याच कशा फसल्या !अशा वऱ्हाडी कवितांनी पुसदकरांना पोट धरून हसविले. निमित्त होते. होळीच्या रंगारंग रंगोत्सव कार्यक्रमाचे. पतंजली योग परिवाराच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. युवा भारत पुसद तालुका प्रभारी प्रवीण मस्के यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रा.डॉ. प्रल्हाद वावरे यांच्या वऱ्हाडी कविता रंगल्या, तर सेवानिवृत्त शिक्षक ल.पु. कांबळे यांची मिमिक्री आणि नकलांनी बहार आली.सेवानिवृत्त प्रा. अशोक बोबडे यांनी विनोदी चारोळ्या सादर केल्या, तर मध्येच काही गंभीर आठवणीही पुढे आल्या.जुन्या पुस्तकांची वही मिळालीपरवा पुस्तके वाचतानाकिती डोळ्यात आसवे आलीतजुन्या त्या श्रावणात नाहतानानिसर्गरम्य वातावरणात रंगलेला रंगोत्सव कार्यक्रम संस्मरणीय ठरला. यावेळी पतंजली योग समितीच्यावतीने पुसद पत्रकार संघाचे अध्यक्ष अखिलेश अग्रवाल, सचिव अनिल चेंडकाळे, प्रा. दिनकर गुल्हाने, प्रा.डॉ. प्रल्हाद वावरे यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी वनभोजनाचा आनंद लुटला. प्रास्ताविक शरद बजाज, तर सूत्रसंचालन मनोज नाईक यांनी केले.या कार्यक्रमाला पतंजली योग समितीचे प्रकाश वानरे, विलास पलिकोंडावार, विजय पद्मावार, प्रवीण मस्के, पंडित गादेवार, डॉ. राजेंद्र बिडवई, संतोष वानखडे, दिगांबर जगताप, अ‍ॅड. विलास देशमुख, अशोक महाजन, सुभाष राय, डॉ. पंकज जयस्वाल, बालाजी कामिनवार, श्रीरंग सरनाईक, अमोल चांडक, पंजाब कदम, संतोष कनोजे, शंकर मंदाडे, उपलेंचवार यांच्यासह योगसाधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.