शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
3
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अटक, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
4
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
7
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
8
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
9
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
10
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
11
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
12
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
13
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
14
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
15
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
16
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
17
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
18
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
19
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...

सर्व सभापती रस्त्यावर उतरणार

By admin | Updated: April 14, 2017 02:32 IST

जिल्ह्यात लाखो क्विंटल तूर शेतकऱ्यांच्या घरात व केंद्रांवर पडून असताना शासनाने शासकीय तूर खरेदी केंद्र

कृषी उत्पन्न बाजार समिती : १५ एप्रिलनंतरही तूर खरेदी सुरू ठेवण्याची मागणीयवतमाळ : जिल्ह्यात लाखो क्विंटल तूर शेतकऱ्यांच्या घरात व केंद्रांवर पडून असताना शासनाने शासकीय तूर खरेदी केंद्र १५ एप्रिलपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयाला जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींनी तीव्र विरोध दर्शविला आहे. १५ तारखेनंतरही किमान दोन महिने ही तूर खरेदी सुरू ठेवावी, अन्यथा शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करू, असा इशारा या सभापतींनी गुरुवारी येथे पत्रपरिषदेत दिला आहे. केंद्र शासनाने १५ एप्रिलपासून नाफेडच्या माध्यमातून होणारी शासकीय तूर खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्र केंद्राने राज्याला तर राज्याने सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांना पाठविले आहे. हे पत्र यवतमाळ जिल्ह्यात धडकताच बाजार समित्यांमध्ये खळबळ निर्माण झाली. कारण आजही बहुतांश केंद्रांवर लाखो क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत पडून आहे. सुरुवातीला बारदाणा नसल्याने व नंतर वेगवेगळी कारणे पुढे करून ही तूर खरेदी थांबविली गेली होती. आता तर ती १५ एप्रिलपासून सरसकट बंद करण्याचा निर्णय शासनस्तरावर घेतला गेला. या निर्णयाविरोधात जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींनी एकजूट केली आहे. या पार्श्वभूमीवर यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सर्व सभापतींनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. सभापती म्हणाले, मुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांसह वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनच्या अध्यक्षांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. आता १५ एप्रिलपर्यंतच तूर खरेदीचे पत्र आले. नंतर टोकनधारक शेतकऱ्यांची तूर खरेदी न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सभापतींनी दिला. खरेदीची मुदत १५ जूनपर्यंत वाढवून देण्याची मागणीही त्यांनी केली. या पत्रकार परिषदेला कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख, यवतमाळचे रवींद्र ढोक, घाटंजीचे अभिषेक ठाकरे, आर्णीचे राजू पाटील, बाभूळगावचे नरेंद्र कोंबे, नेरचे रवींद्र राऊत, वणीचे सचिन कुचनकर, नेरचे निखिल जैत, पांढरवकडाचे प्रकाश मानकर तसेच संचालक अनिल पावडे, महेंद्र गोरडे, गजानन डोमाळे, मुकेश देशमुख, सुरेश चिंचोळकार उपस्थित होते. (शहर वार्ताहरजिल्हाधिकाऱ्यांचा निषेधजिल्ह्यातील बाजार समितींच्या सभापतींवर चक्क फौजदारी गुन्हे दाखल करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केली आहे. हा प्रकार लोकप्रतिनिधींच्या अधिकारावर गदा आणणारा असून गुरूवारी जिल्ह्यातील सर्व सभापतींनी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांचा निषेध नोंदविला.